Water Shortage esakal
नाशिक

Nashik Water Shortage : 935 गावे-वाड्यांना 228 टॅंकरद्वारे पाणी; पावसाअभावी टॅंकरला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Water Shortage : जिल्ह्यात पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, पुरेशा पाऊस नसल्याने अनेक गावे व वस्त्यांची भिस्तही टॅंकरवरच आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची शासनाने दिलेली ३० जूनची मुदत संपुष्टात आल्याने, राज्य सरकारने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ही मुदत ३१ जुलैपर्यंत राहणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९३५ गावे-वाड्यांना २२८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. (lack of rains tankers have been extended till July 31 )

महिनाभरात टॅंकरची संख्या १५० ने घटली आहे. मागील वर्षी सरासरीहून कमी पाऊस झाल्याने जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला. मागील वर्षी उन्हाळ्यात सुरू झालेले टँकर आता पावसाळ्यातही सुरूच आहेत. टॅंकरची संख्या ४०० वर पोचली होती. ७ जूनला जिल्ह्यातील ३६२ गावे आणि ९४१ वाड्या, अशा १ हजार ३०३ ठिकाणी ३९८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जिल्ह्यातील ७ लाख १६ हजार ५०१ नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून होते.

साधारणः जूनमध्ये मान्सूनचे आगमन झाले, की जूनअखेरपर्यंत टँकर बंद होणे प्रशासनाला अपेक्षित होते. जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे टॅंकरची संख्या घटली आहे. मात्र, सर्वव्यापी पावसाने जिल्हाभरात हजेरी लावलेली नाही.पश्चिम भागातील तालुक्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे. पुरेसा पाऊस नसल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात २२८ टँकरद्वारे २२६ गावे आणि ७०९ वाड्या, अशा ९३५ ठिकाणी ४ लाख ५० हजार १८५ नागरिकांची टँकरद्वारे तहान भागवावी लागत आहे. (latest marathi news)

जिल्हा प्रशासनाने ३० जूनपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला परवानगी दिली होती. मात्र, ग्रामीण भागात पुरेशा पाऊस न झाल्याने राज्य सरकारने टॅंकरला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. स्थानिक पातळीवर पाण्याची उपलब्धता होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच ठेवण्यात येणार आहे. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात १६३ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. यात बागलाण (४५) व मालेगाव (४१) तालुक्यात सर्वाधिक विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय सुरू असलेले टॅंकर

नांदगाव (३६), येवला (४५), मालेगाव (३३), सिन्नर (२६), बागलाण (४३), देवळा (२१), चांदवड (२३), पेठ (१) दिंडोरी, कळवण, निफाड, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील टॅंकर बंद झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT