A red onion plant suitable for cultivation in low rainfall.  esakal
नाशिक

Nashik Water Crisis : जिल्ह्यात पाणीबाणीची स्थिती! दोन महिन्यांत फक्त 64 मंडळांनी गाठले टक्केवारीचे शतक

Monsoon Rain Update : अल्प पावसामुळे जिल्ह्यातील केवळ ६४ महसूल मंडळांनीच जून-जुलैच्या पर्जन्याची सरासरी गाठली आहे, तर ५३ मंडळांत मात्र सरासरी गाठणेही मुश्कील झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी जिल्ह्यातील पाणीबाणी संपलेली नाही. अद्यापही मुसळधार पाऊस न पडल्याने सरी अन् अधूनमधून येणाऱ्या पावसावरच खरिपाची पिके बहरली आहेत. अर्थात पिकांना आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

शिवाय नदी, नाले, विहिरी कोरड्याठाक असल्याने जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. अल्प पावसामुळे जिल्ह्यातील केवळ ६४ महसूल मंडळांनीच जून-जुलैच्या पर्जन्याची सरासरी गाठली आहे, तर ५३ मंडळांत मात्र सरासरी गाठणेही मुश्कील झाले आहे. (Nashik Water shortage situation in district)

जिल्ह्यातील मालेगाव, येवला, सिन्नर, नांदगाव, चांदवड व देवळा या तालुक्यांवर नेहमीच पाऊस रुसलेला असतो. भौगोलिकदृष्ट्या विभाजन, पर्जन्यछायेचा प्रदेश आणि पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन यांसह विविध भौगोलिक कारणांमुळे पावसाचे स्वरूप बदलत आहे. यंदाही कुठे कमी तर कुठे जास्त पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९३५ मिलिमीटर असताना आतापर्यंत केवळ ४२९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

सरीवर फुगले पावसाचे आकडे

जुलै ते सप्टेंबर अर्थात वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वच तालुक्यांमध्ये ५० ते ६० टक्के पाऊस पडला आहे. याउलट जून व जुलैचा विचार केल्यास जिल्ह्यात तब्बल ८३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

अद्यापही मुसळधार पाऊस नसला तरी सरीवरच कागदावरचे आकडे फुगत असून, मालेगाव, बागलाण, नांदगाव, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, देवळा, त्र्यंबकेश्वर या दुष्काळी तालुक्यांनी आजपर्यंतची सरासरी पार करत शंभरी गाठली आहे. याउलट पावसाचे माहेरघर असलेल्या सुरगाणा, इगतपुरी, पेठ, नाशिक, कळवण हे तालुके मात्र आजपर्यंतची सरासरीदेखील गाठू शकलेले नाहीत.

महसूल मंडळे तहानलेलेच

जून व जुलै हे मुसळधार पावसाचे दोन महिने संपत आले तरी जिल्ह्यातील महसूल मंडळात अद्यापही टंचाई आहे. किंबहुना अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रमुख दिवस संपल्यावर केवळ ६४ मंडळांमध्येच आजपर्यंतच्या पावसाची सरासरी ओलांडली आहे. आजपर्यंत सरासरीत ६४ मंडळांमध्ये १०० टक्के, तर ५३ मंडळांत ५० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाला आहे. धोडांबे मंडळात २४९ टक्के, तर ननाशी मंडळात २६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. (latest marathi news)

आता महिनाभर सरीवर सरी

पावसाचे मुख्य दोन महिने संपले तरी मुसळधार पाऊस झालेला नाही. आता तर श्रावण महिना सुरू होत असून, सरींचा हा महिना असल्याने मागील दोन महिने सरींच्या पावसावर समाधान मानलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा हा महिनाही सरीवरच काढावा लागणार आहे. नदी, नाले, विहिरी कोरड्या असल्याने अद्यापही ५० ते ७० टक्के जलस्रोताला पाणी उतरलेले नाही. परिणामी, पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून, पिकांचा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

असा पडला आजपर्यंत पाऊस (जून ते सप्टेंबरची सरासरी)

तालुका - वार्षिक पर्जन्यमान - पडलेला पाऊस - टक्के

नाशिक - ६९५ - २३९ - ३४

इगतपुरी - ३०५८ - ८८५ - २९

दिंडोरी - ६७९ - ४६५ - ६८

पेठ - २०४३ - ८२५ - ४०

त्र्यंबकेश्वर - २१६६ - १२५१ - ५७

मालेगाव - ४५७ - ३०० - ६५

नांदगाव - ४९१ - २९९ - ६१

चांदवड - ५२९ - ३७२ - ७०

कळवण - ६३९ - २८० - ४३

बागलाण - ४८८ - ३०४ - ६२

सुरगाणा - १८९५ - ७९५ - ४२

देवळा - ४२२ - १५४ - ७५

निफाड - ४६२ - २५७ - ५५

सिन्नर - ५२२ - २९३ - ५६

येवला - ४५३ - २९१ - ६४

जिल्हा सरासरी - ९३३ - ५१९ - ५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT