water supply scheme esakal
नाशिक

Nashik News : निवडणुकीपूर्वी 286 कोटींच्या योजनेचा नारळ फोडण्याची तयारी; नवीन, जीर्ण पाइपलाइन बदलण्यासाठी निविदा

Nashik : पाइपलाइन बदलण्यासाठी केंद्र सरकारने अमृत-२ योजनेअंतर्गत २८६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नवनगरामध्ये नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी तसेच शहरातील जीर्ण झालेल्या पाइपलाइन बदलण्यासाठी केंद्र सरकारने अमृत-२ योजनेअंतर्गत २८६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा नारळ फोडण्याची तयारी सत्ताधारी भाजपने केली आहे. पाणीपुरवठा विषयक कामे पूर्णपणे मार्गे लागण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीची चिन्हे दिसू लागली आहे. (water supply scheme of 286 crore has been approved under Amrut 2 scheme )

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत महत्त्वाची कामे अडकू नये यासाठी सत्ताधारी भाजपकडून प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमृत-२ योजने अंतर्गत मंजूर झालेल्या २८६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ शनिवारी (ता. ३) निविदेच्या माध्यमातून करण्यात आला. या योजनेअंतर्गत शिवाजीनगर व गांधीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण केले जाणार असून, त्यासाठी ११ कोटी बारा लाख रुपयांचा खर्च आहे. चेहेडी पंपिंग ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची मुख्य वितरण वाहिनी बदलली जाणार आहे. यातून नाशिक रोड भागातील पाणीपुरवठा जलदगतीने होणार आहे.

त्याचबरोबर कार्बन नाका ते रामालय जलकुंभापर्यंत ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार आहे. शिवाजीनगर ते कार्बन नाका व पुढे पपया नर्सरी तसेच बारा बंगला ते गांधीनगर व रामराज्य ते नहुश जलकुंभापर्यंत अस्तित्वात असलेली जलवाहिनी बदलली जाणार आहे. पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र ते शक्तिनगरपर्यंत ६०० मिलिमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी ९५.२० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. लवाटेनगर जलकुंभातून २४ तास पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी १.३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. (latest marathi news)

जीर्ण जलवाहिन्या बदलणार

नगरपालिका काळापासून शहरात जुन्या पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत. त्या पाइपलाइन जीर्ण झाल्या असून, यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. गळती झालेल्या पाण्याचा हिशोब लागत नाही. त्यामुळे जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यांबरोबरच शहर व परिसरात नवीन झालेल्या नगरामध्ये मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या टाकल्या जाणार आहे. त्यासाठी जवळपास १७९.२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. एकूण योजना ३४२ कोटी रुपयांची असून यातील पहिल्या टप्प्यात २८६ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे.

पुढील आठवड्यापासून उद्‌घाटनाचा धडका

ऑक्टोबर महिन्यात निवडणुकांची शक्यता असल्याने त्यापूर्वी शहरातील भाजपच्या तीनही आमदारांकडून विविध विकासकामे मार्गी लावले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेतून विविध विकास कामांची यादी मागविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून शहरात विविध विकासकामांच्या उद्‌घाटनाचा नारळ फुटणार आहे.

''अमृत-२ योजनेंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी विधानसभेत आवाज उठविला. मंत्रालयात पाठपुरावा केला. निधी मिळाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असून नाशिकरोड, जेलरोड भागातील पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.''- ॲड. राहुल ढिकले, आमदार

''अमृत-२ योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात प्राप्त होणाऱ्या निधीतून करावयाच्या पाणीपुरवठा विषयक कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून लवकरच कामाला सुरवात होईल.''- संजय अग्रवाल, अधिक्षक अभियंता, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT