Water Supply  esakal
नाशिक

Nashik Water Supply News : पिंपळगावचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार : सरपंच भास्करराव बनकर

Nashik News : पिंपळगावकरांना पाणीटंचाईसह ग्रामपंचायत प्रशासनावर जनरेटरसाठी लागणाऱ्या इंधनाचा अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत होता.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : दोन कोटी देयक थकल्याने ‘महावितरण’ने पिंपळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पालखेड धरणावरील वीजकनेक्शन तोडले होते. त्यामुळे पिंपळगावकरांना पाणीटंचाईसह ग्रामपंचायत प्रशासनावर जनरेटरसाठी लागणाऱ्या इंधनाचा अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत होता.

महावितरण व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यातील संघर्ष तूर्त थांबला असून, ग्रामपंचायीतने ४६ लाखांची थकीत रक्कम महावितरणला अदा केली आहे. त्यामुळे वीज जोडणी होऊ पिंपळगाव शहराला नियमित पाणीपुरवठा होऊ शकेल. सरपंच भास्करराव बनकर यांनी पिंपळगाव ‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता किसन कोपनार यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. (Nashik Water supply to Pimpalgaon will remain continue news)

जिल्हा परिषदेने मुद्रांक शुल्क, तर बाजार समितीने भरला थकीत कर थकित वीजबिल भरल्याखेरीज वीजपुरवठा पूवर्वत न करण्याची ताठर भूमिका ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी घेतली. ग्रामस्थांकडून अजून ३५ टक्के करवसुली बाकी आहे. अखेर सरपंच भास्करराव बनकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला.

मुद्रांक शुल्कची रक्कम जिल्हा परिषदेकडून मिळाल्यास पाणीप्रश्‍न मार्गी लागू शकतो. मित्तल यांनी तत्परता दाखवत मुद्रांक शुल्कचे ३४ लाख रुपये पिंपळगाव ग्रामपंचायतीला मंगळवारी (ता. २६) रात्री नऊला ऑनलाईन वर्ग केले. त्याचबरोबर आमदार दिलीप बनकर यांनीही पिंपळगाव बाजार समितीकडे असलेल्या थकीत कराचा सुमारे ४४ लाखांचा धनादेश ग्रामपंचायतीला दिला. जिल्हा परिषद व पिंपळगाव बाजार समितीने थकीत कर भरल्याने पाणीप्रश्‍नावर पडदा पडला.

कर्मचाऱ्याच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर उपसा पंप कार्यान्वित

दोन दिवसांपूर्वी पालखेड धरणाच्या पाण्याने तळ गाठला होता. करंजवण धरणातील पाणी पालखेड धरणात येताना पिंपळगांव योजनेच्या पंपाभोवती गाळ व काडी, कचऱ्याने वेढला गेल्याने बंद पडला होता. त्यामुळे एक दिवस पिंपळगावचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी व पंप दुरुस्तीसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी १५ तास प्रयत्नाची शिकस्त केली. ट्यूबवर बसून पंपाची दुरुस्ती केली. कर्मचाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर उपसापंप कार्यान्वित झाला. (latest marathi news)

करांचे तीन कोटी थकित

मागील सत्ताधाऱ्यांच्या तुघलघी कारभारामुळे सव्वादोन कोटी रुपयांची वीजबिल थकले. त्याचा त्रास आम्हाला होत आहे. जिल्हा परिषदेने मुद्रांक व पिंपळगाव बाजार समितीने थकीत कर भरून थकित वीजबिलाचा प्रश्‍न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. अजूनही नागरिकांकडे तीन कोटी रुपये म्हणजे उद्दिष्टापेक्षा ३५ टक्के रक्कम थकीत आहे. काही व्यक्ती राजकीय हेतूने प्रेरित होऊन निराधार वक्तव्य करून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुबलक नव्हे, पण आवश्‍यक तेवढा पाणीपुरवठा केला जाईल. नागरिकांनी पाण्याचा अपव्य टाळून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सरपंच भास्करराव बनकर यांनी केले. ‘महावितरण’ला थकीत रकमेचा धनादेश देतेवेळी उपसरपंच विनायक खोडे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब अहिरे, सदस्य दशरथ मोरे, दत्तू मोरे, आशिष बागूल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT