Nashik Gangapur Dam esakal
नाशिक

Nashik Gangapur Dam : गंगापूर धरणातून लोखंडी पाइपद्वारे पाणीपुरवठा कामाला सुरवात; साडेचार किलोमीटर लाईन टाकणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत यापूर्वीची सिमेंट पाइपलाइन बदलून लोखंडी टाकण्याच्या कामाला सुरवात झाली असून पहिल्या टप्प्यात ४.३ किलोमीटर काम केले जाणार आहे. त्यासाठी लोखंडी पाइप शहरात दाखल झाल्याने वांरवार पाइपलाइन फुटून पाणी वाया जाणे व पाणीपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. (Water supply work started from Gangapur dam through iron pipe)

शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलून बारा बंगला जलशुद्धीकरण व शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोचविले जाते. तेथे पाण्यावर शुद्धीकरण केले जाते व पुढे घरोघरी स्वच्छ आणि पुरवठा होतो. २०१७ ते २००० या कालावधीमध्ये बाराशे मिलिमीटर व्यासाच्या दोन सिमेंटच्या पाइपलाइन टाकण्यात आल्या होत्या.

मात्र शहराची वाढत्या लोकसंख्येमुळे जलवाहिनीची क्षमता वाढविणे गरजेचे होते. जुनी व सिमेंटची जलवाहिनी असल्याने वारंवार गळती होऊन आणि पुरवठा बंद करावा लागत होता. त्यामुळे गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान साडेबारा किलोमीटर लांबीची ८०० मिलिमीटर व्यासाची लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी केंद्र सरकारचे १५ व्या वित्त आयोगातून १७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. (latest marathi news)

मार्च २०२४ पर्यंत निधी खर्च झाला नाही, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी दिल्याने काम रखडले होते. २०२४ व २५ या आर्थिक वर्षात निधी खर्च करण्याची लेखी शासनाने महापालिकेकडून घेतल्याने महापालिकेने निविदा प्रक्रिया अंतिम करून प्रत्यक्ष संबंधित ठेकेदाराला कामाचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने साडेबारा किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीसाठी काम सुरू झाले आहे.

एक वर्ष चालणार काम

सप्टेंबर २०२५ पर्यंत योजनेचे काम चालणार आहे. १ ऑक्टोबरपासून पाईपलाईनच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. तत्पूर्वी पाइपलाइन एका जागी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पाइपवर गंज प्रतिबंधात्मक प्रक्रिया केली जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT