Nashik News : मालेगावला आजपासून 3 दिवसांआड पाणी; धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस जेमतेमच
मालेगाव : ‘कसमादे’त गेल्या दीड महिन्यात जेमतेम पाऊस झाला. आतापर्यंत ९० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसला असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चणकापूर व गिरणा धरणातील जलसाठ्यात अद्याप समाधानकारक वाढ झालेली नाही. उपलब्ध पाणी पाहता शहरातील पाणीपुरवठा दोन दिवसांऐवजी तीन दिवसांआड केला जाणार आहे. (Water to Malegaon every 3 days after from today)
शनिवारी (ता.२७)पासून महापालिका हद्दीतील विविध झोनमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. पावसाने ओढ दिल्याने ऐन पावसाळ्यात मालेगावकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. मालेगाव शहराला चणकापूर व गिरणा धरणातून पुरवठा केला जातो. चणकापूर धरणातून गिरणा नदीद्वारे डाव्या कालव्याद्वारे महापालिकेच्या साठवण तलावात पाणी येते.
तेथून वाहिनीद्वारे येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचते. गिरणा धरण ते जलशुद्धीकरण केंद्र अशी थेट वाहिनी कार्यान्वित आहे. चणकापूरसह ‘कसमादे’तील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास गिरणा व मोसम नद्यांना पूर येतो. या पाण्यातूनच गिरणा धरण भरले जाते. (latest marathi news)
सध्या चणकापूरसह विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला नाही. धरणे कोरडीठाक आहेत. महापालिकेकडे सद्यस्थितीत उपलब्ध असलेला पाणीसाठा ऑगस्टअखेरपर्यंत पुरवावा लागेल. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले असून, शहरात २७ जुलैपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
"शहरातील ज्या नळधारकांनी नळांना तोट्या लावलेल्या नाहीत, त्यांनी तत्काळ आपल्या नळांना तोट्या लावाव्यात. नागरिकांनी घरासमोर, रस्त्यावर व गटारीत पाणी सोडू नये. वाहने धुण्यासाठी पाणी वाया घालवू नये. अन्यथा, संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे."- रवींद्र जाधव, आयुक्त, मालेगाव महापालिका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.