Temperature rise esakal
नाशिक

Nashik Whether Update : पाऱ्यात पुन्‍हा वाढ; तापमान 33 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Whether Update : शहरात ऊन, पावसाचा खेळ सुरुच असून, गेल्‍या दोन दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. मंगळवारी (ता.२५) दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तरी पावसाच्‍या सरी बरसल्या नाहीत. मात्र दमट वातावरणामुळे पाऱ्यात पुन्‍हा वाढ नोंदविली आहे. नाशिकचे कमाल तापमान ३३.१ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. गेल्‍या रविवारी (ता. २३) शहरासह उपनगरी भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दिवसभर रिमझिम पावसाने नागरिकांना तृप्त केले होते. (Weather Update Temperature rise again at 33 degrees )

खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरवात झाल्‍याची प्रचिती नागरिकांना या दिवशी आली होती. मात्र यानंतर मात्र गेल्‍या दोन दिवसांपासून पावसाने पुन्‍हा ओढ दिली आहे. मंगळवारी तर सकाळपासून ढगाळ वातावरण झालेले होते. एकीकडे ढग दाटून आलेले असताना सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस बरसला नव्‍हता. ढगाळ वातावरणामुळे सूर्य झाकोळला गेल्‍याने प्रखर सुर्यकिरणांपासून नागरिकांचा बचाव झाला. (latest marathi news)

मात्र वातावरणात आद्रता वाढल्‍याने उकाड्यामध्ये कमालीची भर पडली होती. नाशिकचे किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३३.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यापूर्वी एकच दिवस कमाल तापमान तीस अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. मात्र सातत्‍याने तापमान तीस अंशांच्‍या वर राहाते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT