नाशिक रोड : नाशिक शहरात सध्या गॅस सिलिंडरमध्ये गॅसच्या वजनात घट येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत, अनेकवेळा घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये १४.२ किलोग्रॅम गॅसऐवजी ११ ते १२ किलो गॅस मिळत आहे. (Weigh gas cylinder on delivery)
यामध्ये प्रत्यक्ष सिलिंडरचे वजन १५ ते १६ किलो भरते. मात्र ग्राहकांनी गॅस सिलिंडरची डिलिव्हरी घेताना डिलिव्हरी बॉयकडे असणाऱ्या वजन काट्याचा वापर करून सिलिंडरचे वजन तपासून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नाशिक शहरात सध्या डोमेस्टिक म्हणजेच घरगुती वापराच्या रिकाम्या सिलिंडरचे वजन १४.२ किलोग्रॅम आहे.
यामध्ये प्रत्यक्ष सिलिंडरचे वजन कमीत कमी १५ ते १६ किलोच्या दरम्यान असते. असे किमान संपूर्ण सिलिंडरचे वजन २९ ते ३० किलो दरम्यान भरायला हवे. सध्या नाशिक शहरात अनेक सिलेंडरच्या वजनामध्ये फरक आढळून येत आहे.
नागरिकांनी सिलिंडर घेतल्यावर सिलिंडर लवकर संपण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे सिलिंडरमध्ये मुळात गॅस कमी येत असल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे. यामध्ये घरगुती किंवा व्यावसायिक सिलिंडरमधून गॅस काढून हा गॅस खासगी वाहनांमध्ये भरण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप होत आहे.
त्यामुळे अनेक वेळा घरगुती सिलिंडरमधील गॅस काढून घेतला जातो. व्यावसायिक सिलिंडरमध्ये १९ किलो गॅस भरलेला असतो. नाशिक शहरात अनेक ठिकाणी खासगी वाहनात घरगुती गॅस भरण्याचे उद्योग छुप्या पद्धतीने सुरू असून याकडे प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप होत आहे. (latest marathi news)
दोनशे रुपयांत पलटी
घरगुती वा व्यावसायिक सिलिंडर चारचाकी, दुचाकी वाहनांमध्ये दोनशे रुपयांमध्ये पलटी करून दिले जाते. असे पलटी करण्याचे उद्योग सध्या नाशिक शहरात विविध ठिकाणी सुरू आहेत. नाशिक रोड येथील सुभाष रोड, कॅनॉल रोड येथील गोसावी नगर, भद्रकाली, पखाल रोड, द्वारका, सिडको येथील भंगार मार्केट, सातपूर येथील अंबड लिंक रोड, पंचवटी येथील फुलेनगरच्या आसपास असे पलटी करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळी हे सिलिंडर पलटी करण्याचे उद्योग सुरू असतात. प्रशासनाने पाहूनही याकडे डोळेझाक केल्याचे बोलले जात आहे.
"ग्राहकांनी सिलिंडरची डिलिव्हरी घेताना सिलिंडरचे वजन मोजून घ्यायला हवे. आम्ही प्रत्येक गाडीवर इलेक्ट्रॉनिक काटा दिला आहे. डिलिव्हरी बॉयला इलेक्ट्रॉनिक काटा लावून वजन मापून घ्यायला हवे. ते जर वजन करून देत नसतील तर थेट सिलिंडर वितरकाशी संपर्क साधावा. ग्राहकांनी जागृत राहिल्यास सिलिंडरमधून गॅसची चोरी होणार नाही."
- रमेश पाडेकर, गॅस वितरक) फोटो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.