On the first day of school, the students were welcomed enthusiastically esakal
नाशिक

School First Day : आमरस, जिलबीने विद्यार्थ्यांचे स्वागत! 3 लाख विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या तीन हजार २०० प्राथमिक शाळांमध्ये धडे गिरवत असलेल्या तीन लाख विद्यार्थ्यांचे शनिवारी (ता. १५) पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा परिषदेच्या तीन हजार २०० प्राथमिक शाळांमध्ये धडे गिरवत असलेल्या तीन लाख विद्यार्थ्यांचे शनिवारी (ता. १५) पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत झाले. कुठे विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले, तर कुठे गुलाबपुष्प देऊन स्वागत झाले. गावात बैलगाडीतून मिरवणूक काढत फीत कापत अगदी वाजतगाजत विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. (School First Day)

विद्यार्थ्यांना पुरणपोळी, आमरस, जिलबी, सोनपापडी देत त्यांचे तोंड गोड करण्यात आले. शासनाच्या गोंधळामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षाची सुरवात ही जुना गणवेश धारण करून झाली. पहिल्या दिवशी ९० टक्के शाळांवर पाठ्यपुस्तकांचे वाटप झाल्याचा दावा प्राथमिक शिक्षण विभागाने केला आहे. उन्हाळ्याची सुटी संपल्यानंतर शनिवारी शाळेची पहिली घंटा वाजली.

नवीन दप्तर, नवीन पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर काहीसा आनंद पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे औक्षण करत, गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले. शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे शिक्षकांनी औक्षण करत स्वागत केले. काही ठिकाणी बैलगाडीतून मिरवणूक काढत, शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले.

नवी कोरी पुस्तके, नवीन मित्र, जुन्या मित्रांची भेट, चिमुकल्यांना पहिल्या दिवशी शाळेत सोडण्यासाठी आलेले पालक, अशा उत्साहाच्या वातावरणात शाळेचा परिसर गजबजला होता. ग्रामीण भागातील अनेक शाळा नव्या रंगात रंगल्या होत्या. शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या फुलांनी तसेच चित्रांनी सजविण्यात आल्या होत्या. (latest marathi news)

सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. पाठ्यपुस्तके वितरित केले असले, तरी नवीन गणवेश मात्र पहिल्या दिवशी मिळाला नाही. जुना गणवेश घालून विद्यार्थी शाळेत दाखल झाले होते. शासनाच्या आदेशप्रमाणे विद्यार्थ्यांना गोड पदार्थ देण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोड शिरा, सोनपापडी, जिलबी, चॉकलेट, पेढे, बर्फी तसेच काही शाळांमध्ये आमरस-पुरणपोळीचे जेवण विद्यार्थ्यांना देण्यात आले.

विभागप्रमुखांकडून शाळांमध्ये स्वागत

शाळांच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यालयातील विभागप्रमुख शाळांमध्ये दाखल झाले. शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, जळगाव (गा.) आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव येथे प्रवेशोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी अभोणा (ता. कळवण) येथे भेट देत प्रवेशोत्सवात सहभागी झाले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, पिंपळस रामाचे (ता. निफाड) शाळेत झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

येथे त्यांनी मुलांना गुलाबपुष्प दिले. प्रभारी मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रदीप चौधरी डुबेरे (ता. सिन्नर) शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकवाटप केले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी पेठ तालुक्यातील शाळांना भेट दिली. या वेळी पारंपरिक नृत्य करत विद्यार्थ्यांचे स्वागत झाले.

दापुरे (ता. मालेगाव) शाळेत विद्यार्थ्यांना आमरस-पुरणपोळीचे भोजन देण्यात आले. येथील विद्यार्थ्यांची प्रवेशोत्सवानिमित्त वाजतगाजत प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळी विविध मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

"जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा झाला. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली. ८० ते ९० टक्के शाळांवर पुस्तकाचे वाटप झाले. शासनस्तरावरून गणवेश न मिळाल्याने गणवेशाचे वाटप झाले नाही." - डॉ. नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swara Bhaskar: अभिनेत्री स्वरा भास्करचा पती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या मैदानात, मुंडेंचा विरोधकही ठरला

अर्रर्र! अर्जुन कपूरचा चित्रपट ठरला सगळ्यांत फ्लॉप; OTT वरही मिळेना संधी

Kothrud Assembly Election : कोथरूडमध्ये चंद्रकांत विरूद्ध चंद्रकांत! पाटलांना मोकाटेंचे आव्हान

Ishan Kishan: धडाकेबाज फलंदाजाचे वडीलही राजकारणात; लवकरच करणार मुख्यमंत्र्यांच्या पक्षात प्रवेश

Diwali 2024 : रविवारची सुट्टी सार्थकी लावा, या सोप्या स्टेप्सनी घरीच दिवाळीचा आकाश कंदिल बनवा

SCROLL FOR NEXT