नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील २७ वी पश्चिम विभागीय परिषद शुक्रवारी (ता. २) नाशिक येथे होत आहे. बैठकीस गृहमंत्री उपस्थित राहणार नसले तरी गुजरात, गोवा, महाराष्ट्र या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली, दमण, दीव या केंद्रशासित प्रदेशातील मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (Western Regional Conference of Ministry of Home Affairs today)
गृहमंत्रालयाच्या आंतरराज्य परिषद सचिवालयातर्फे दर वर्षी पश्चिम विभागीय परिषद घेण्यात येते. यंदा या बैठकीचा मान महाराष्ट आणि विशेषत: नाशिकला मिळाला आहे. या बैठकीत महिला व बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांचा आणि बलात्काराच्या प्रकरणांचा जलद तपास.
बलात्कार आणि पॉक्सो कायद्यातील खटल्यांचा निपटारा करण्यासाठी जलदगती विशेष न्यायालयांच्या (एफटीएससी) योजनेची अंमलबजावणी तसेच सर्वसामान्यांच्या समस्यांवर चर्चा होणार आहे. रस्तेजोडणी, वीज, उद्योग आणि इतर बाबींचा समावेश असणार आहे. (latest marathi news)
प्रत्येक गावात पाच किलोमीटरच्या आत बँका आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखांची सुविधा, पोषण अभियानाद्वारे मुलांमधील कुपोषण दूर करणे.
शाळेतील मुलांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सरकारी रुग्णालयांचा सहभाग आणि सर्वसामान्यांच्या हिताचे मुद्दे यावर या बैठकीत राष्ट्रीय स्तरावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.