IT Park File Photo esakal
नाशिक

Nashik IT Park: समाजमन - ‘आयटी पार्क’मुळे विकासाचा वारू दौडणार

Nashik News : नाशिक शहर हे सध्या देशात सर्वांत झपाट्याने विकसित होणारे शहर आहे.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : नितीन ठाकरे

नाशिकमध्ये आयटी पार्क यावे, ही काळाची गरज आहे. अनेक वेळा चर्चा होतात, मात्र प्रत्यक्षात आयटी पार्कपासून नाशिककर दूरच आहेत. नाशिक शहर हे सध्या देशात सर्वांत झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. या शहरातील हवा, पाणी, पौराणिक महत्त्व अशा अनेक बाबींमुळे नाशिकमध्ये स्थायिक होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, पुणे याला असलेली कनेक्टिव्हिटी असणारे नाशिक शहर आहे. ‘मविप्र’सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेबरोबरच अनेक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था नाशिकमध्ये आहेत. (Nashik wind of development blow due to IT Park article adv nitin thackeray marathi news)

महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देश व परदेशातूनही अनेक युवक शिक्षणासाठी नाशिकचा पर्याय निवडतात. सहाजिकच विद्यार्थी जसा शिक्षण घेऊन बाहेर पडेल तसेच त्याला उपलब्ध रोजगाराचीही आवश्यकता असते. रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात करावयाची असेल, तर पुणे, मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही आयटी पार्क उभारले पाहिजे, ही काळाची गरज आहे. नाशिकमध्ये जर आयटी पार्क उभारले गेले तर नाशिकचा सर्वांगीण विकास घडेल, याबद्दल तिळमात्र शंका नाही.

आयटी पार्कच्या माध्यमातून नोकरी तर मिळेलच; पण अनेकांना आयटीच्या माध्यमातून स्टार्टअप, नवीन उद्योग सुरू करायचा आहे. त्यासाठी पोषक वातावरण हवे. यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून आयटी पार्कची निर्मिती होणे आवश्यक आहे.

अनेक वेळा आयटी पार्क येणार येणार अशा चर्चा झाल्या, मात्र प्रत्यक्षात तसे काही घडलेले दिसत नाही. यासाठी आपण कुठे कमी पडतो का, याचा विचार होण्याची गरज आहे. आज आयटी पार्क नाशिकला मिळाले तर नाशिक निश्चितच नोएडा, गुरुग्राम, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी स्पर्धा करू शकेल.

आयटी हबची क्षमता

नाशिकमधील वातावरण इतके योग्य आहे, की जर इथे आयटी पार्क आले तर मोठ्या शहरात जाण्यापेक्षा विद्यार्थी वर्ग आयटी शिक्षणासाठी नाशिकचा पर्याय निवडतील. यासाठी नाशिकमध्ये आयटी पार्क का असावे, याची योग्य मांडणी शासनाकडे करणे आवश्यक आहे.

आयटी पार्क आल्यास देश-परदेशातील नामवंत अशा टीसीएस, इन्फोसिससारख्या आयटी कंपन्या नाशिकमध्ये निश्चितच येतील. नाशिकमध्ये या क्षेत्राशी संबंधित अनेक कंपन्या आहेत. त्या कामही करत आहेत, पण जेव्हा आयटीशी संबंधित महत्त्वाचे ब्रॅन्ड नाशिकमध्ये येतील तेव्हा निश्चितच आपली ओळखही जागतिक पटलावर निर्माण होईल.

नाशिकमध्ये आयटी, आयटीशी संबंधित काही कंपन्या काम करत आहेत, मात्र त्या संघटित नाहीत. त्यांनीही एकत्र येणे आवश्यक आहे. नवीन पार्क आल्यास येथील कंपन्या व नवीन येणाऱ्या संस्था यांचे एक मोठे आयटी हब तयार होऊ शकेल इतकी मोठी क्षमता नाशिकमध्ये आहे. (Latest Marathi News)

स्थानिकांना मिळेल रोजगार

नाशिक एमआयडीसीमध्येही अनेक मोठ्या कंपन्या आहेत. लहानापासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांनाच आयटीची आवश्यकता आहे. नाशिकमध्ये आयटी पार्क आले तर निश्चितच आयटी पार्क व या कंपन्या एकत्रित मिळून काम करण्यासाठी वाव आहे. त्या माध्यमातून नाशिकमधील स्थानिकांना रोजगार मिळेल. रोजगाराच्या संधी व नवीन स्टार्टअपमध्ये नाशिकमधील युवकांचा जास्तीत जास्त सहभाग असेल.

विविध क्षेत्रांना लाभ

आयटी पार्क नाशिकमध्ये आल्यानंतर फक्त आयटी संबंधित लोकांचा फायदा होतो, हा गैरसमज कुणीही करू नये. जेव्हा एखादे नवीन क्षेत्र विकसित होते तेव्हा ते उभारताना त्याच्या आजूबाजूच्या परिसराचाही विकास होत असतो. इन्फ्रास्ट्रक्चर, बांधकाम, हॉटेलिंग, ट्रान्स्पोर्ट अशा विविध क्षेत्रांना नियमितपणाचा व्यवसाय या माध्यमातून निश्चितच मिळू शकतो.

आयटी पार्कचे नाशिकसाठी फायदे

१) चांगला पगार : बाकी क्षेत्रांशी तुलना करता सरासरी आयटी क्षेत्रात मिळणारा पगार हा जास्त असतो. अगदी नुकतेच पासआउट झालेल्या फ्रेशरलादेखील चार लाखांहून अधिकचे पॅकेज देणाऱ्या कंपन्या आहेत आणि अनुभवानुसार हा पगार वाढत जातो.

२) वर्क फ्रॉम होम : आयटी क्षेत्रात तुम्ही ऑफिसमध्ये उपलब्ध असणे आवश्यक नाही. घरी बसूनदेखील काम करू शकता. फक्त एक संगणक आणि चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक.

३) नोकरीचे मुबलक पर्याय : सध्या पूर्ण विश्व हे ऑनलाइन आणि डिजिटल होत चालले आहे. यामुळे आयटी क्षेत्रात नोकरीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

४) ज्ञानाला महत्त्व : या क्षेत्रात तुमचे वय किती आहे यापेक्षा तुमचे ज्ञान आणि टॅलेंट किती आहे, याला प्राधान्य दिले जाते व त्यानुसार पगार, प्रमोशन्स दिले जाते.

५) परदेशात जाण्याची संधी : बऱ्याच कंपन्यांमधून परदेशात काम करण्यासाठी संधीही दिली जाते (सर्व खर्च हा कंपनीतर्फे असतो आणि विदेशानुसार पगारदेखील बराच वाढतो.

(लेखक मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT