ओझर (जि. नाशिक) : मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट आली आहे. यात जिल्ह्यात सर्वोच्च नीचांकी तापमानाची नोंद ओझर येथे झाली आहे. ओझरमध्ये सध्याचे तापमान ५.७ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेल्याने आता 'क्या रखा है, महाबळेश्वर में मौसम आजमाना है तो आवो ओझर में' असे संदेश सोशल मीडियात व्हायल होऊ लागले आहेत. तसेच तापमानाचा पारा घसरल्याने येथे शाळा उशिराने भरत आहे. शाळेची घंटाही उशिराने होऊन शाळा भरत आहेत.(Nashik Winter Update at Ozar Mercury at below 6 degrees Nashik news)
गेल्या काही दिवसांपासून ओझर व परिसरात सकाळपासूनच गार वारे वाहण्याच्या बरोबरच तापमानाचा आकडा देखील खाली जात होता. सोमवारी, (ता.२१) पहाटे एचएएल येथे पहाटेच्या सुमारास उत्तर महाराष्ट्रातील सर्वात नीचांकी तापमान ५.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांना थंड वाऱ्याने चांगलीच हुडहुडी भरली असून दिवसा देखील हवेत गारवा निर्माण झाला होता. ओझरमध्ये घसरलेल्या तापमानाचा परिणाम परिसरातील शाळांवर झाला आहे.
त्यामुळे नेहमीपेक्षा वीस मिनिटे उशिरा शाळा भरल्या आहेत. तर जनजीवन देखील सकाळच्या सत्रात विस्कळित झाले. यंदा पर्जन्यमान देखील लांबल्याने शेतकऱ्यांवर याचा थेट परिणाम होत खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष हंगाम चालू असून थंडीपासून द्राक्ष मण्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पहाटेच ट्रॅक्टरवर सवार होऊन विविध औषधांची फवारणी करत आहे.
ओझरसह परिसरांत थंडीपासून बचाव व संरक्षण होण्यासाठी शेकोट्या पेटवल्या जात आहे. थंडीचा वाढलेला जोर हा रब्बीतील गहु, हरबरा या पिकांसाठी पोषक असला तरी द्राक्षबागांसाठी नुकसानकारक ठरत आहे. द्राक्षांच्या वेल आणि फळवाढीला याचा मोठा फटका बसत आहे. वाढलेल्या थंडीने द्राक्ष बागायतदार आपल्या बागेत शेकोटीने ऊब देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.