winter esakal
नाशिक

Nashik Winter Update: वातावरणातून पुन्‍हा थंडी गायब

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नोव्‍हेंबर संपत असताना आत्ता कुठे वातावरणात गारवा जाणवू लागला होता. परंतु ढगाळ वातावरणामुळे पुन्‍हा एकदा थंडी गायब झालेली आहे.

सोमवारी (ता. २०) नाशिकच्‍या किमान तापमानात वाढ नोंदविली गेली. किमान २१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. (Nashik Winter Update Cold again disappeared from atmosphere)

यंदा‍ हिवाळ्यात नाशिककरांना कडाक्याच्या थंडीची अद्याप प्रतिक्षाच आहे. ऑक्‍टोबरअखेर तापमान घटून १४.५ अंश सेल्सिअसपर्यंत आले होते. मात्र त्‍यानंतर पुन्‍हा एकदा पारा वाढला होता.

गेल्‍या आठवड्याभरापासून पारा खालावत असताना १४ अंशांपर्यंत नीचांकी किमान तापमानाची नोंद झालेली होती. परंतु सोमवारी पुन्‍हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे वातावरणातील गारवादेखील गायब झालेला आहे.

सोमवारी नाशिकचे किमान तापमान २१.० अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पाऱ्यात होणाऱ्या चढ-उतारामुळे नाशिककरांना आरोग्‍यविषयक तक्रारींमध्ये वाढ होत आहे.

सर्दी-खोकल्‍यासह ताप व इतर संसर्गजन्‍य आजारांच्या तक्रारी वाढलेल्‍या आहेत. आरोग्‍याची विशेष काळजी घेण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जातो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT