Nashik Winter Update Cold weather Demand for warm clothes esakal
नाशिक

Nashik Winter Update: थंडीची चाहूल; उबदार कपड्यांना मागणी

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : थंडीची चाहूल लागताच विविध प्रकारच्या उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. रविवार सुटीचे औचित्य साधन नागरिकांनी स्वेटर, जॅकेट यांसह अन्य उबदार कपडे घेण्यास शालिमार, तसेच तिबेटियन मार्केट येथे गर्दी केली होती. (Nashik Winter Update Cold weather Demand for warm clothes)

गेल्या काही दिवसांपासून शहरात रात्रीच्या सुमारास थंडी जाणवू लागली आहे. दोन दिवसांपासून शहरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारवाही वाढला आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे.

दिवाळीच्या सुट्या आणि दोन दिवसांपासून थंडीचे वाढलेले प्रमाण यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उबदार कपड्यांची सतत विक्री होताना दिसून येत आहे. सुमारे ३० ते ४० टक्के विक्री होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

पुढील दिवसांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता असल्याने उबदार कपड्यांच्या मागणीतही वाढ होणार असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. उलनमध्ये फॅशनेबल आलेल्या स्वेटरला अधिक मागणी आहे.

महिला आणि लहान मुलांच्या उबदार कपड्यांची अधिक प्रमाणात खरेदी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. जॅकेट, बटर, लुधियाना, लाँग असे अनेक प्रकारचे स्वेटर विक्रीस उपलब्ध झाले आहेत.

त्याचप्रमाणे लहान मुलांचे स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे, मफलर आदी उबदार कपड्यांची विक्री होत आहे. ३०० रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत स्वेटर, तर एख हजार रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत लेदर जॅकेट विक्रीस उपलब्ध आहेत.

वातावरणाचा व्यवसायावर परिणाम

सध्या वातावरण स्थिर नसल्याने थंडीच्या दिवसांत कडक ऊन जाणवत असून, अचानक पाऊस कोसळत आहे. पावसामुळे बाजारात शुकशुकाट पसरला आहे. व्यावसायिकांनाही दुकान वाढवून घेण्याची वेळ आली आहे.

शिवाय थंडीच्या दिवसात कडाक्याचे ऊन पडत असल्याने उबदार कपडे विक्रीचे प्रमाण कमी झाले होते. एकूणच निश्चित वातावरण नसल्याने व्यवसायावर परिणाम झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

"गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उबदार कपडे विक्रीस प्रतिसाद मिळत आहे. दहा ते वीस टक्क्यांनी दरात वाढ झाली आहे. महिला आणि लहान मुलांच्या कपड्यांना अधिक मागणी आहे."

-अजहर सय्यद, विक्रेता

उबदार कपड्यांचे प्रकार दर

स्वेटर ------------------ ३०० ते ६००

लाँग स्वेटर ---------------- ४०० ते ६५०

शिवलेस स्वेटर -------------- ३००

लेदर जॅकेट --------------- ५०० ते पाच हजार

टर्किस स्वेटर ------------------ ४५०

साधी कानपट्टी --------------३० ते ६०

लहान मुलांसाठी कार्टून कानपट्टी ----- ६० ते १२०

कानटोपी ------------------३० ते ३००

हातमोजे -------------------३० ते १५०

पायमोजे ----------------------२० ते १००

मफलर ----------------------१२० ते ३००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT