Young women in Hegdewar Nagar confront and beat a molester who made obscene gestures, highlighting the importance of women's self-defense.  esakal
नाशिक

Nashik Viral News: अगदी चित्रपटात घडतं तसंच... छेड काढणाऱ्या टवाळखोरास तरुणींनी भर चौकात दिला चोप! VIDEO व्हायरल

Young Women in Nashik Take a Stand Against Molestation; Social Media Praises Their Courage : कोलकत्ता आणि बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनांनंतर सोशल मीडियावर महिलांना स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर, हेडगेवार नगरमध्ये या तरुणींनी दाखवलेली धाडसी कृती म्हणजे महिलांच्या स्वसंरक्षणाचा खरा अवतार आहे.

Sandip Kapde

नाशिक: नाशिकच्या सिडको परिसरातील हेडगेवार नगरमध्ये बुधवारी (ता. २८) दुपारी एक वाजता एका तरुणीला अश्लील हावभाव करत छेड काढल्यामुळे तीन ते चार तरुणींनी एकत्र येऊन टवाळखोरास बेदम चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, या तरुणींचे धैर्य आणि साहसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

महिलांच्या स्वसंरक्षणाचा रौद्र अवतार

कोलकत्ता आणि बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनांनंतर सोशल मीडियावर महिलांना स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर, हेडगेवार नगरमध्ये या तरुणींनी दाखवलेली धाडसी कृती म्हणजे महिलांच्या स्वसंरक्षणाचा खरा अवतार आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आणला आहे.

घटनेची माहिती

बुधवारी दुपारी, हेडगेवार नगरमध्ये एक तरुणी रस्त्याने जात असताना चार-पाच टवाळखोरांपैकी एकाने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले आणि तिची छेड काढली. ही छेडखानी पाहून तरुणीने टवाळखोराला जाब विचारला. त्या वेळी रस्त्याने जाणाऱ्या इतर तरुणीही तिच्या मदतीला धावून आल्या आणि त्यांनी टवाळखोराला मारहाण केली. या धाडसी कृतीमुळे इतर टवाळखोर घाबरले आणि त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, या तरुणींच्या धैर्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे धाडस आणि प्रत्युत्तर दिल्यामुळे अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या घटनेने महिलांना स्वसंरक्षणाची प्रेरणा दिली असून, या प्रकारचे धाडसी पाऊल उचलण्याचे धैर्य इतर महिलांमध्येही निर्माण झाले आहे.

स्थानिकांची मागणी: टवाळखोरांवर कडक कारवाई करा

या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, महिलांच्या सुरक्षेसाठी या टवाळखोरांवर कठोर पावले उचलणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल.

महिला सुरक्षेबाबत जनजागृतीची गरज

नाशिकमधील हेडगेवार नगरमध्ये घडलेल्या या घटनेने महिलांच्या सुरक्षेबाबत आणखी एकदा चर्चेला वाचा फोडली आहे. महिलांनी कसे सुरक्षित राहावे आणि त्यांच्या हक्कांसाठी कसे उभे राहावे, याबाबत जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या घटनेने महिलांना स्वसंरक्षणासाठी सजग राहण्याची आणि धैर्याने प्रत्युत्तर देण्याची प्रेरणा दिली आहे.

हेडगेवार नगरमधील या घटनेने नाशिक शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई करुन अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

Porsche Car Accident : आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

IPL Auction 2025: कोण आहे गुरजपनीत सिंग, ज्याच्यासाठी CSK ने ३० लाखापेक्षा ७ पटीने पैसे ओतत कोट्यवधी रुपयांना केलं खरेदी

Car Accident : इंदापूरजवळ कारच्या अपघातात शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT