Women's Day Special : जिद्द अन् परिश्रमाला सरावाची जोड मिळाली, तर यशाची शिखरे पादाक्रांत करणे सोपे जाते, याचे प्रत्यंतर लासलगावची तरुणी श्रावणी देसाई हिने आणून दिले. लासलगावपासून सात-आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकमाळेगाव येथील साठवण तलावात तेराव्या वर्षांपासून सुरू केलेला पोहण्याचा सराव तिला समुद्रकन्या म्हणून ओळख देण्यापर्यंत घेऊन गेला. (nashik Women Day Special marathi news)
नियमित सराव अन् पोहण्यासाठी गुरू बनलेल्या वडिलांपासून प्रेरणा घेत श्रावणी महिला व तरुणींसाठी आयडॉल बनली आहे. कांदानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगावातील श्रावणी देसाई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिकत आहे. खडकमाळेगावच्या साठवण तलावात स्वीमिंग ग्रुप रोज पोहण्यासाठी जातो. त्यात श्रावणीचे वडिलही जातात.
खेळण्या-बागडण्याच्या वयात तिने वडिलांकडे पोहण्याचा अट्टाहास धरला. तिची चिकाटी पाहून वडिलांनी तिला प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. यात ती इतकी तरबेज झाली, की राजोडी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत तलावातून थेट समुद्रावर आपला झेंडा रोवण्याची किमया तिने साधली. (latest marathi news)
श्रावणी नववीत असताना, जिल्हास्तरीय व विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली. चेन्नई येथे झालेल्या ट्रायथलॉन क्रीडा प्रकारात स्विमिंग, सायकलिंग व रनिंग या एकावेळी करावयाच्या तीनही प्रकारांतही तिने सहभाग नोंदविला. कोल्हापूरच्या सागर पाटील जलतरण तलावात ५० मीटर फ्री स्टाइल व ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात सहभागी होऊन प्रमाणपत्र मिळविले.
लोणावळा येथील ॲम्बी व्हॅलीत झालेल्या खुल्या जलतरण स्पर्धेत दीड किलोमीटर प्रकारात पदक पटकावले. नोव्हेंबरमध्ये पालघर जिल्ह्यातील राजोडी समुद्र किनाऱ्यावर पॉवरपीकतर्फे झालेल्या एक किलोमीटर सागरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पदक व बक्षीस मिळविले. १६ डिसेंबरला सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झालेल्या सागरी स्पर्धेत पाच किलोमीटर स्पर्धेत राज्यात सहावा क्रमांक पटकावून पदक मिळवले.
७ जानेवारीला गुजरात राज्यातील पोरबंदर या खडतर समजल्या जाणाऱ्या समुद्रात पाच किलोमीटर स्पर्धेत सहभागी घेत १७ वा क्रमांक पटकावला. बेसबॉल स्पर्धेत जिल्हास्तरीय, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. बेसबॉलमध्ये तिला राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.