Women waving papads and packing papads in the shed of Madhura Mahila Papad Home Industry at Dabhadi esakal
नाशिक

Women's Day 2024: पापडाच्या गृहोद्योगातून खडतर आयुष्यात आणली ‘शीतल’ता! दाभाडीतील लघुउद्योजक महिलेने 200 महिलांना दिला रोजगार

Success Story : लघुउद्योजकाने केलेले मार्गदर्शन, जिद्द, कष्ट, मेहनत व वाटेल ते काम करण्याची तयारी या जोरावर येथील शितल अनिल वाघ या गृहउद्योजिका झाल्या आहेत.

प्रमोद सावंत

मालेगाव : पतीला व्यवसायात सातत्याने अपयश येत होते. तीन उद्योग नाउमेद करणारे ठरले. उधारी वाढत गेली. उद्योग बंद पडले. अशा परिस्थितीत घराची चूल पेटविण्यासाठी व कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आपण काहीतरी व्यवसाय करावा असे डीएड झालेल्या गृहिणीच्या मनात आले.

यातून त्यांनी सोशल मिडीयावर प्रेरणा देणारे व्हिडिओ व यशस्वी व्यक्तींच्या स्टोरी पाहण्यास सुरुवात केली. यातच सातवी शिकलेल्या पुरुषाने चार हजार महिलांना दिला रोजगार ही स्टोरी त्यांनी पाहिली. यानंतर राजेंद्र डोंगरे (सोलापूर) यांच्या भेटीसाठी थेट आठवड्यातून दोनदा मालेगाव ते सोलापूर गाठत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. (Women's Day 2024)

लघुउद्योजकाने केलेले मार्गदर्शन, जिद्द, कष्ट, मेहनत व वाटेल ते काम करण्याची तयारी या जोरावर येथील शितल अनिल वाघ या गृहउद्योजिका झाल्या आहेत. स्वत:ला सावरतांनाच त्यांनी दोनशे महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यांना विविध स्वयंसेवी संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे. (Nashik international Womens Day 2024 Papad home industryDabhadi shital waghmarathi news)

दाभाडी येथील मधुरा महिला पापड गृहउद्योगाच्या शेडमध्ये पापड लाटणाऱ्या महिला

शितल वाघ यांचा दाभाडी-पिंपळगाव रस्त्यावरील मधुरा महिला पापड गृहउद्योग नावारुपाला आला असून त्यांचे स्पेशल हॅन्डमेड पापड उत्तर महाराष्ट्रात लोकप्रिय ठरले आहेत. श्री. डोंगरे यांना भेटायला गेल्यावर त्यांची तळमळ बघून त्यांनी मार्गदर्शन केले. तुमच्याकडे कामासाठी महिला आहेत का असा प्रश्‍न विचारला.

५० महिला असल्याचे खोटे सांगितले. त्यावर डोंगरे यांनी तातडीने त्यांच्याकडील जुनी मशीन विकत देत एक महिला प्रशिक्षणासाठी पाचशे रुपये रोजाने पाठविली. यातून सन २०१८ मध्ये दहा महिलांच्या जोरावर सुरु झालेल्या मधुरा गृहउद्योगाने दोनशे महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. (Latest Marathi News)

सुरुवातीला महिलांना उडीद पापड लाटणे, वाळवणे, त्याचा आकार, एक किलोत किती पापड तयार करावयाचे याविषयी प्रशिक्षण दिले. त्यानंतर रावळगाव येथील छोटेखानी कारखान्यातून महिलांना तयार उडीद पीठ घरोघरी देऊन हॅन्डमेड पापड तयार करुन घेतले जातात. दाभाडी, मालेगाव पाठोपाठ नाशिक (सिडको) येथे मधुराचे तिसरे युनिट सुरु झाले आहे. उच्च दर्जा, गुणवत्ता, स्वच्छता व हॅन्डमेड असल्याने त्यांचा पापड ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.

उद्योगाचा विस्तार करतांना सौ. वाघ यांनी मसाला कांडप यंत्र, नागली पापडाची खिसी घेण्याचे मशिन व विविध प्रकारचे सर्व पीठ दळून देणारी यंत्रसामुग्री आणली आहे. हा गृहउद्योग हळूहळू विस्तारतो आहे. व्यवसायात पती अनिल वाघ हे उत्पादनाकडे लक्ष देतात. सौ. वाघ या विक्री, विपणन, वितरण या बाजू समर्थपणे सांभाळतात. स्वत:च्या घर संसाराचा गाडा सांभाळतांना महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याचे त्यांना मोठे समाधान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT