Dr. Chanchal Sable, Dr. Harshada Firodia, Dr. Yogita Hire, Dr. Jyoti Sonwane, Dr. Manjusha Darade, Vandana Patil, Sonali Raje Pawar, Charushila Deshmukh- Gaikwad esakal
नाशिक

Women's Day Special : सिडकोतील राजकारणी महिला ‘लय भारी’ !

Women's Day Special : सिडको परिसरातील बहुतांश महिला या राजकारणात सक्रिय असल्याचे प्रकर्षाने बघायला मिळते.

प्रमोद दंडगव्हाळ: सकाळ वृत्तसेवा

Women's Day Special : सिडको परिसरातील बहुतांश महिला या राजकारणात सक्रिय असल्याचे प्रकर्षाने बघायला मिळते. एकेकाळी राजकारणात येण्यापूर्वी महिला व परिवार विचार करत असे. परंतु महिलांची शिक्षणातील प्रगती व त्यांना मिळालेले आरक्षण यामुळे त्या आता हळूहळू नव्हे तर झटकन पुढे येऊ लागल्या आहेत. याचे सकारात्मक चित्र सिडको परिसरात महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळत आहे. (nashik Women's Day Special Politician women in cidco is best marathi news)

वास्तविक पाहता सिडको परिसर हा तसा खानदेश बहूल कामगार वर्गाचा भाग आहे. असे असतानाही येथील महिला राजकारणाकडे एक संधी म्हणून बघताय हे समाजासाठी चांगले द्योतकच म्हणावे लागेल. सिडको व अंबड परिसरातून मंदा दातीर, संध्या आहेर, शोभा पडोळ, सुमन पडोळ, शीतल भामरे, कल्पना पांडे, प्रतिभा पवार, कल्पना चुंबळे, रत्नमाला राणे, अलका आहिरे, हर्षा बडगुजर, सुवर्णा मटाले, भाग्यश्री ढोमसे, हर्षदा गायकर, छाया देवांग, किरण गामणे, कावेरी घुगे आदींनी स्वतःच्या कर्तबगारीवर

नगरसेवक, सभापती व आपआपापल्या पक्षात मोठ्या पदावर आपला झेंडा रोवला आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सिडकोतील काही महिला व नवयुवतींनी समाजकारणाबरोबर राजकारणात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे त्या उच्चशिक्षित असल्याचे दिसून येते. काहींना राजकीय पार्श्वभूमी आहे. तर काही आपली राजकीय कारकीर्द स्वतःच्या पायावर उभे राहून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. (latest marathi news)

त्यामध्ये विशेष करून काही जणांचे आवर्जून नाव घ्यायचे ठरले, तर त्यात डॉ. चंचल साबळे, डॉ. हर्षदा फिरोदिया, डॉ. योगिता हिरे, डॉ. ज्योती सोनवणे, डॉ. मंजूषा दराडे, वंदना पाटील, सोनालीराजे पवार, चारुशीला देशमुख- गायकवाड, रश्मी हिरे, ज्योती कंवर- ठाकरे, रूपाली पाटोळे, आकांक्षा दिंडोरकर, शिवानी पांडे, साधना मटाले, प्रियांका दोंदे, सोनाली ठाकरे, सुमन सोनवणे, शीतल विसावे, कामिनी दोंदे, निर्मला पवार आदीचे नावे आवर्जून घ्यायला हवीत.

-डॉ. चंचल साबळे, सौंदर्यतज्ज्ञ, अध्यक्ष, राज्य वैद्यकीय महिला आघाडी, भाजप

-सोनाली राजे पवार, जिल्हाध्यक्ष, महिला, भाजप

- वंदना पाटील, जिल्हाध्यक्ष, महिला काँग्रेस

- सोनाली ठाकरे, अध्यक्ष, महिला मोर्चा, भाजप

- साक्षी दिंडोरकर, अध्यक्ष, युवती मोर्चा, भाजप

-रूपाली काटे-पाटोळे, बीसीए, विभागीय अध्यक्ष सातपूर-अंबड, शरद पवार गट

-पूजा पाटोळे-कुंभार, १२ वी, अध्यक्ष, ओबीसी, रिपाई

-कोमल महाले, उपाध्यक्ष, महिला मोर्चा, भाजप व संचालिका, विधिज्ञ बहुउद्देशीय संस्था

- शिवानी पांडे, बी. ई. सिव्हिल, एम. टेक, उबाठा गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT