Wood piles in open drains on road esakal
नाशिक

Nashik News: रस्त्यातील उघड्या गटारीत लाकडाचे ओंडके! सिन्नर-निफाड रस्त्यावर बारागाव पिंपरी येथील रेल्वे उड्डाण पुलाखालील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

वावी : सिन्नर निफाड पिंपळगाव बसवंत राज्य महामार्ग क्रमांक 27 वर सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे इंडियाबुल्स प्रकल्पाकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकच्या पुलाखाली उघड्या पडलेल्या गटारीमुळे अपघात होऊ नये यासाठी त्या गटारीत लाकडाचे ओंडके उभे करून जुगाड करण्यात आला आहे. मात्र हे जुगाड या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांच्या जीवावर बेतणारे ठरले आहे. (Wood piles in open drains on road under railway flyover at Baragaon Pimpri)

सिन्नर बारागाव पिंपरी दरम्यान निफाड रस्त्यावर इंडियाबुल्सची रेल्वे लाईन छेदून जाते. गुळवंच शिवारातील इंडियाबुल्स च्या थर्मल पावर प्रोजेक्टसाठी ओढा येथून रेल्वे लाईन टाकण्यात आली. या रेल्वे लाईनचे गुळवंच पर्यंत काम देखील झाले आहे. मात्र इंडियाबुल्सचा सदर प्रोजेक्ट डब्यात गेल्यामुळे हा रेल्वे मार्ग विनावापर पडून आहे.

बारागाव पिंपरी येथे रेल्वे ट्रॅकच्या खालून रस्ते वाहतुकीसाठी बोगदा बनवण्यात आला आहे. इंडियाबुल्सने रेल्वे ट्रॅक साठी अधिग्रहित केलेल्या जागेत काँक्रीटचे भक्कम बांधकाम करण्यात आले. ट्रॅक खाली वाहनांसाठी बनवलेल्या बोगद्यामध्ये पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी गटारीची व्यवस्था करण्यात आली.

या गटारीवर लोखंडी ढापे टाकण्यात आले. मात्र या ढाप्यांची वारंवार चोरी होत असल्याने व रस्त्याचा हा भाग रेल्वे ट्रॅक बनवणाऱ्या कंपनीकडे असल्यामुळे ढापे चोरीला गेल्यावर किंवा तुटल्यावर त्या जागी नवीन ढापे कोणी टाकायचे हा प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बारागाव पिंपरीहुन सिन्नर कडे येणाऱ्या मार्गावरील गटारीचा ढाबा गायब झाला. (latest marathi news)

या ठिकाणी वाहनांना अपघात होऊ नये म्हणून तात्पुरते जुगाड करण्यात आले आहे. गटारीच्या खड्ड्यात लाकडी ओंडके उभे करून बाजूला मोठे दगड ठेवण्यात आले आहेत. मात्र हे जुगाड अपघातांना निमंत्रण देणारे ठरले आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळेस औद्योगिक कामगार दुचाकीवरून ये जा करत असतात. दिवसादेखील दुचाकी व मोठ्या वाहनांची वर्दळ असते.

पावसाळ्याच्या दिवसात हे ओंडके लक्षात न आल्याने अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी तातडीने ढापा बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. सिन्नर ते निफाड रस्ता पिंपळगावपर्यंत हायब्रीड एन्यूईटी (हॅम) तत्त्वावर बांधण्यात आला आहे. या रस्त्याचा विकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नांदगाव सब डिव्हिजन ने केला आहे.

रस्त्याची काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे तुकडे करून तो दोन्ही तालुक्यातील बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याऐवजी अधिक लांबी असणाऱ्या निफाडच्या उपविभागाकडे वर्ग करण्यात आला. पिंपळगाव बसवंत येथून सुरू होणारा रस्ता सिन्नरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यापर्यंत संपतो. या संपूर्ण मार्गाची जबाबदारी सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकामच्या निफाड सब डिव्हिजनकडे आहे.

"रेल्वे मार्गिका व बारागाव पिंपरी येथील संबंधित बांधकाम इंडियाबुल्सच्या मालकीच्या जागेत असल्याने बांधकाम विभागाने तेथील दुरुस्ती कशी करावी हा प्रश्न आहे. मात्र वाहनधारकांना अडचण सहन करावी लागत असल्याने गेल्या वेळेस देखील त्यासंदर्भात उपाययोजना केली. गटारीवरील ढापे चोरीला जाण्याच्या घटना मागे देखील घडल्या आहेत. प्रत्येक वेळी ढापे बदलणे शक्य नाही. कारण मोठी वाहने त्यावरून जाणार असल्याने त्यांचा खर्च अधिक आहे. तरी देखील या ठिकाणी कायमस्वरूपी योग्य तो बंदोबस्त करण्याबाबत नियोजन केले जाईल."

- प्रकाश घोडे (उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम निफाड उपविभाग)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT