Ozar Municipal Council. esakal
नाशिक

Nashik News : ओझर नगरपरिषदेचे काम ‘रामभरोसे’! 2 विभागांतील गैरव्यहार ठरतोय चर्चेचा विषय

Nashik News : नगरपरिषद अस्तित्वात येऊन बराच कालावधी लोटला. मात्र, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने काम रामभरोसे सुरू आहे, तर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

ओझर : नगरपरिषद अस्तित्वात येऊन बराच कालावधी लोटला. मात्र, पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने काम रामभरोसे सुरू आहे, तर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच नगररचना आणि बांधकाम विभागांचे काम आलबेल सुरू आहे. ‘पैसे द्या, बांधकाम मंजुरी घ्या’, हे धोरण सर्रास सुरू झाल्याने नागरिक वैतागले आहेत.

‘चहापेक्षा किटली गरम’ या ओळींचा प्रत्यय प्रत्येक क्षणी ओझरकर अनुभवत आहेत. पूर्ण वेळ प्रशासक मिळावा, यासाठी नागरिकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. (Nashik work of Ozar Municipal Council in trouble Abuse in 2 departments becoming topic of discussion marathi news)

नाशिकनंतर ओझरचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. येथील नगररचनामधील देवाणघेवाण आणि बांधकाम विभागात चालढकलपणा ओझरच्या नावाला काळीमा फासणारा आहे. आताचे मुख्याधिकाऱ्यांकडे येवल्याचा अतिरिक्त भार असल्याने नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

अनेकवेळा वयोवृद्ध, नोकरदार, व्यापाऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नगरविकास विभागाने ओझरबाबत ठोस धोरण आखत तातडीने पूर्णवेळ अधिकारी द्यावा, अथवा आताच्या मुख्याधिकाऱ्यांची पूर्णवेळ नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नगररचना विभागात मोठी उलाढाल?

येथील नगररचना विभागात सुरू असलेल्या मोठ्या उलाढाली चर्चेचा विषय ठरत आहे. अधिकारी मात्र हे सर्वत्र कॉमन आहे. ‘तुम्हाला इतके द्यावेच लागतील’, असे म्हणत अडवणूक करतात. चकरा मारून हतबल झालेल्या नागरिकांनी देण्याचे कबूल केले, तरी दोन टेबल दाखविले जात आहेत. यामुळे नागरिकांची होत असलेली ससेहोलपट थांबण्याचे नाव घेत नाही.  (latest marathi news)

मंजुरी हवी आहे, मग यांना भेटा

प्रशासकीय भवनात दोन्ही विभागांत सरकारी पगार घेत असलेले एक- दोन कर्मचारी मोठी वसुली करून साहेबांना इतके द्यावे लागतील, असे म्हणत ठरलेल्या पॉइंटवर खिसे गरम करीत असून, एका महिला अधिकाऱ्याची अरेरावी चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्याधिकारी ओझरला नेमके कधी भेटणार हेच माहीत नसल्याने ओझर नगरपरिषदेचे कामकाज ‘रामभरोसे’ झाले आहे.

"हा विषय नगरविकास विभागांतर्गत येतो. त्यांनी दिलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. नगरविकास विभागाकडून अद्याप नव्या नेमणुका झालेल्या नाहीत. ज्यावेळी होईल, तेव्हा ओझरबाबत निर्णय घेतला जाईल."-जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli: ''मी कुणाच्या बापाला भीत नाही, बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर...'' बंडखोरीवरुन डिवचणाऱ्याला विश्वजीत कदमांनी भरसभेत झापलं

'फक्त विग आणि मिशी घालून कुणी पृथ्वीराज होत नाही', मुकेश खन्नांनी उडवली अक्षय कुमारची खिल्ली

Stock Market: शेअर बाजारातील घसरणीत मोठा दिलासा! निफ्टी लवकरच करणार नवा विक्रम, पण कधी?

IND vs SA: कमी सामन्यांमध्ये सुसाट कामगिरी; Arshdeep Singh ने परदेशी मैदानावर घेतले सर्वाधिक ट्वेंटी-२० विकेट्स

Jayant Patil: " पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहूयात", पाहा जयंत पाटलांनी काय केलं? Video Viral

SCROLL FOR NEXT