All the faculty members of the college participated in wearing black tape for various pending demands, including that the state government should follow the UGC norms regarding faculty recruitment. esakal
नाशिक

Nashik News : सटाणा येथे प्राध्यापकांकडून काळ्या फित लावून कामकाज! 4 मार्चला विभागीय संचालक कार्यालयावर धरणे

Nashik News : येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पुक्टो संघटनेतर्फे सर्व प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : राज्य शासनाने प्राध्यापक भरतीबाबत यूजीसीच्या नियमांचे पालन करावे यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक आंदोलनाच्या तयारीत आहेत. येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पुक्टो संघटनेतर्फे सर्व प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.

याबाबत स्पुक्टो संघटनेचे अध्यक्ष प्रा. नीलेश पाटील, उपाध्यक्ष प्रा. शांताराम वळवी, सचिव प्रा. स्वप्नील शेंडगे, खजिनदार प्रा. धनराज अहिरे यांनी प्राचार्य डॉ. विजय मेधने यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला. (Nashik Satana Dharna at office of Divisional Director on March 4 marathi news)

प्राध्यापक महासंघातर्फे प्रलंबित मागण्यांसाठी अनेक वेळेस पाठपुरावा करूनही शासनातर्फे दखल घेतली न गेल्याने तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वारंवार अवहेलना होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहेत.

महाराष्ट्र हे शिक्षणात अग्रगण्य राज्य असूनही राज्यात ६० टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. परिणामी उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून १०० टक्के प्राध्यापक भरती करावी, सीएचबी धोरण रद्द करावे, युजीसी रेगुलेशन नुसार समग्र योजना कोणताही बदल न करता लागू करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. (Latest Marathi News)

आंदोलनात प्रा. डॉ. मोहन कांबळे, प्रा. अमित निकम, प्रा. स्वामी पवार, प्रा. अनिल पाटील, प्रा. नानासाहेब निकम, प्रा. डॉ.कृष्णा पाडवी, प्रा. डॉ. रोहिदास शिंदे, प्रा. डॉ. प्रशांत कोळी, प्रा. डॉ. गणेश लिंबोळे, प्रा. डॉ. सचिन पवार, प्रा. युवराज गातवे आदी सहभागी होते.

संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा

तीन टप्प्यात हे आंदोलन होणार असून ४ मार्चला विभागीय संचालक कार्यालयावर धरणे आंदोलन, २७ मार्चला राज्यातील विविध विद्यापीठांवर मोर्चा काढला जाणार आहे. १५ एप्रिलला शिक्षण संचालकांकडे आंदोलन केले जाईल. ३० एप्रिलपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही प्राध्यापक महासंघाने निवेदनात दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT