Electric Vehicle esakal
नाशिक

Electric Vehicle : ईव्हीचे आव्हान आधीच स्वीकारले; निमाकडून आयोजित कार्यशाळेत बेळे यांची माहिती

Nashik News : नवनवीन आव्हाने स्वीकारणारे शहर अशी नाशिकची आगळी ओळख बनली आहे. इलेक्ट्रिकल व्हेईकलचे आव्हानही नाशिकने स्वीकारले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नवनवीन आव्हाने स्वीकारणारे शहर अशी नाशिकची आगळी ओळख बनली आहे. इलेक्ट्रिकल व्हेईकलचे आव्हानही नाशिकने स्वीकारले आहे. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा)ने त्या दृष्टीने दोन वर्षांपासूनच जनजागृती मोहीम हाती घेतली आहे, असे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले.

एएसडीसी, निमा आणि डब्ल्यूआरआय इंडियातर्फे इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये सुरळीत आणि फक्त संक्रमणासाठी समग्र आणि कुशल उपक्रम तयार करणे (सीएचएएससी ईव्हीएस) या विषयावर शुक्रवारी (ता.१४) आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर निमाचे सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष आशिष नहार, राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल.

ईवि मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख राहुल धाडफळे, महिंद्रा अँड महिंद्राचे लीड क्वालिटी ॲश्युरन्स प्रमुख सचिन भामरे, ऑटोमोटिव्ह कौशल्य विकास परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी, स्किल डेव्हलपमेंटच्या सहाय्यक आयुक्त आणि अनिशा तडवी आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीचे सहयोगी संचालक चैतन्य कानूर आदी होते.

पर्यावरणपूरक वाहने रस्त्यावर धावावीत यासाठी सरकारतर्फे विविध योजना जाहीर केल्या आहेत. ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात नाशिकने घेतलेली गरुड झेप वाखाणण्याजोगी आहे. इलेक्ट्रिकल व्हेईकलसाठी सरकारने जाहीर केलेल्या विविध योजना, त्यासाठी मिळणारे अनुदान याबाबत मोठी मोहीम उघडली आहे. (latest marathi news)

आजच्या चर्चासत्राने या क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता निश्चितच बळावेल, असा विश्वासही बेळे यांनी व्यक्त केला. या क्षेत्रात उद्योजकांसाठी कोणकोणत्या नवीन संधी आहेत आणि त्याचा फायदा त्यांनी कसा घ्यावा, याबाबत निमाचे सचिव पांचाळ यांनी प्रास्ताविकात माहिती दिली.

कार्यशाळेत संक्रमणाची आव्हाने, कौशल्याच्या गरजा आणि व्यवसायाच्या धोरणांबद्दल व्यापक चर्चा झाली. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी यावेळी उत्तरे दिली. कार्यशाळेस, अक्षय गोलिया, कैलास पाटील, सतीश कोठारी, अतुल चंपानेरकर, श्री दादा देशमुख, विशाल देरांगे, जयंत टोपे, नितीन आव्हाड यांच्यासह दोनशेहून अधिक उद्योजक आणि अधिकारी उपस्थित होते.

ऑटोमोटिव्ह उद्योगाचे भविष्य

ओईएम, ईव्ही स्टार्ट-अप, ऑटो-घटक उत्पादक, इतर घटक उत्पादक (ज्यांना ईव्हीसाठी उत्पादने तयार करण्यात रस आहे) ते या कार्यशाळेत सहभागी झाले होते. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादनात अग्रेसर बनण्याच्या तयारीत असताना या भागातील ऑटोमोटिव्ह उद्योगाचे भविष्य कसे घडवायचे ते आम्ही बघत आहोत, असे इलेक्ट्रिक मोबिलिटीचे सहयोगी संचालिका चैतन्या कानूर यांनी कार्यशाळेची माहिती देताना सांगितले.

ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील आघाडीच्या उद्योग भागधारकांसह नेटवर्क यामुळे तयार होणार आहे. ईव्ही संबंधित उत्पादनातील संधीचा मार्गही यामुळे खुला होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT