Alzheimer patient esakal
नाशिक

World Alzheimer Day : अल्झायमरबरोबर रुग्णांनाही घ्या समजून! सेवा, शुश्रूषा, उपचारांतून वृद्धांचे परावलंबित्व होते कमी

Latest Health News : अल्झायमर हा डिन्मेशिया कॉमन प्रकार आहे. मेंदूत ठराविक रासायनिक बदल झाल्यास त्याचे ‘प्लॉटस’ तयार होतात. त्यामुळे मेंदूचे कार्य विचलित होते.

दीपिका वाघ

नाशिक : नुकत्याच ओळख करून दिलेल्या व्यक्तीला विसरणे, फ्रिज नेमके काय काढण्यासाठी उघडले हे न समजणे, रस्ता चुकणे, भास, संशय, उदासीनता, एकच गोष्ट वारंवार सांगणे किंवा स्वत:च्याच मुलांना न ओळखणे अशी वर्तणूक करणारे ज्येष्ठ घरात असतील तर, संपूर्ण कुटुंब हतबल होते. मात्र या अल्झायमरबरोबर रुग्णांनाही संयमाने समजून घेणे गरजेचे आहे. (World Alzheimer Day 2024 Understand patients)

अल्झायमर हा डिन्मेशिया कॉमन प्रकार आहे. मेंदूत ठराविक रासायनिक बदल झाल्यास त्याचे ‘प्लॉटस’ तयार होतात. त्यामुळे मेंदूचे कार्य विचलित होते. त्यातून स्मरणशक्ती, वागणूक, विचार, भावना मेंदूला चालना देणारे घटक कार्य करेनासे होतात. दुर्दैवाने अल्झायमर पूर्णपणे बरा होईल, अशी उपचार पद्धती उपलब्ध नाही.

मात्र, सेवा, सुश्रूषा, औषधोपचाराने विसरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. रुग्णाची क्वॉलिटी ऑफ लाइफ’ सुधारते. आजाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यास विसरण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. ५५-६५ नंतर ८०-८५ वयोगटातील ३० टक्के ज्येष्ठांना अल्झायमर होण्याची शक्यता असते.

आयुर्मान वाढले ही सकारात्मक बाब असली तरी, दीर्घकाळ असणाऱ्या रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या आजारांमुळे वयानुसार वाढत जाणारे घटक मेंदूत बदल घडवून आणतात. त्यातून डिन्मेशियांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुरूषांच्या तुलनेने महिलांमध्ये अल्झायमर जास्त आढळून येतो परंतु, त्याचे विशेष कारण नाही.

घरच्यांचा संयम बघणारा अल्झायमर

अल्झायमर झालेला रूग्ण नॉर्मल दिसतो, परंतु आजाराबाबत घरच्यांना आजार लक्षात येत नाही. वय वाढले म्हणून ज्येष्ठ त्रास देतात, असा समज बाळगला जातो. या वयात घरच्यांना मदत करायची सोडून उलट घरच्यांना त्रास सहन करावा लागतो. यातून घरात वादविवाद होतात. अल्झायमर दीर्घकाळ सुरू राहणारा आजार असल्याने मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊन घरच्यांवर परावलंबित्व वाढते. अल्झायमरमुळे कुटुंब मानसिक, आर्थिकदृष्ट्या हतबल होते. (latest marathi news)

अल्झायमर टाळण्यासाठी

मेंदूला जेवढे कमी काम तेवढी अल्झायमर होण्याची शक्यता वाढते. निवृत्तीनंतर स्वत:ला सतत अॅक्टीव्ह ठेवणे. रोजच्या दैनंदिन कामात नेहमी व्यस्त राहणे, मेंदूला चालना मिळेल असे काम करत रहावे, शब्दकोडे सोडवणे, वाचन या माध्यमातून मेंदू अॅक्टिव्ह ठेवावा, यामुळे अल्झायमर दूर राहतो.

"अल्झायमर वयाच्या साठीनंतर आढळून येणारा आजार आहे. दीर्घकाळ टिकून राहणारा आजार असल्याने आजाराचे निदान त्वरित झाले तर वृद्धांचे परावलंबित्व कमी होते. उपचार खर्चिक नसतात केवळ सेवा, शुश्रूषा, प्रेम आणि पूर्णवेळ केअर टेकरची गरज मात्र पडू शकते."

-डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ञ

"अल्झायमर मेंदूवर परिणाम करणारा विकार आहे. यामुळे स्मरणशक्ती, विचारसरणी आणि वर्तनावर प्रभाव पडतो. मेंदूतील पेशींचा हळूहळू नाश होत जातो, ज्यामुळे स्मृती कमी होऊन दैनंदिन कार्यात अडथळे येतात."

-डॉ. मृणाल भारव्दाज, मानसशास्त्र विभागप्रमुख, पंचवटी कॉलेज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT