world animal day esakal
नाशिक

World Animal Day : राज्याची 21वी पशुगणना रखडली! 1 सप्टेंबरला सुरू होणारी गणना ऑक्टोबर उजाडूनही प्रतीक्षेत

Latets Nashik News : पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल अॅपचे अपडेशन झालेले नसल्याने ही पशुगणना रखडली आहे. या महिन्यात पशुगणनेला सुरुवात होईल, डिसेंबर २०२४ अखेर ती पूर्ण केली जाईल, असे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दर पाच वर्षांनी होणारी पशुगणना, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून १ सप्टेंबरपासून सुरू होणार होती. मात्र, ऑक्टोबर महिना उजाडूनही या पशुगणनेला सुरुवात होऊ शकलेली नाही. पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल अॅपचे अपडेशन झालेले नसल्याने ही पशुगणना रखडली आहे. या महिन्यात पशुगणनेला सुरुवात होईल, डिसेंबर २०२४ अखेर ती पूर्ण केली जाईल, असे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे. (State 21st animal census stopped)

पशुसंवर्धन विभागाकडून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. देशातील जनतेची जशी जनगणना केली जाते, त्या धर्तीवरच ही मोहीम राबविली जाते. या वर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत २१ वी पशुगणना करण्याचे निश्चित झाले होते. ही गणना यंदा पूर्णपणे पेपरलेस होणार आहे. पशुगणनेसाठी यंदा पहिल्यांदा स्मार्टफोनचा वापर केला जाणार असून, ती एकाच वेळी संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.

प्रथमच ऑनलाइन पद्धतीने मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणारी ही पशुगणना चार महिने चालणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने सांगितले होते. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जय्यत तयारीदेखील केली. मात्र, मोबाईल अॅपमध्ये आणखी दोन ते तीन अॅप अपडेट करण्याचे काम सुरू आहे. हे अपडेशन झाल्यानंतर, अॅप डाउनलोड करून गणनेला सुरुवात होईल.

२०१९ मध्ये झालेल्या २० व्या पशुगणनेसाठी प्रगणकांना टॅबलेट दिले होते, त्यापूर्वीची पशुगणना नोंदवहीत केली जात होती. नोंदवहीत अनेक रकाने होते. ते भरताना बराच वेळ जात असे. मात्र, या वर्षी होणाऱ्या पशुगणनेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच वेळेची बचत होण्यासाठी एका विशिष्ट अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. (latest marathi news)

त्याच्या माध्यमातूनच सॉफ्टवेअरवर पशुधनाची माहिती भरली जाणार आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींची प्रगणक म्हणून नेमणूक केली आहे. या प्रगणकांना २८ ते ३० ऑगस्टदरम्यान नाशिक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय मार्गदर्शनदेखील करण्यात आलेले आहे.

अशी होते पशुगणना

पशुगणना मोहिमेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, कुक्कुट, अश्व, वराह, पाळीव कुत्री, भटकी जनावरे, पशुपालन वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाणार आहे. गणना केलेल्या आधारावरच शासनाकडून विविध धोरण योजना आखल्या जातात. तसेच निधीची उपलब्धता केली जाते.

"२१ वी पशुगणना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सर्व तयारी केली आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना २८ ते ३० ऑगस्टदरम्यान जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे तालुकानिहाय प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मात्र, शासनाकडून येणार मोबाईल अॅप आलेले नसल्याने गणना सुरू झालेली नाही. आठवडाभरात हे अॅप उपलब्ध होण्याची शक्यता असून, लागलीच पशुगणना सुरू होईल. डिसेंबरअखेर ही गणना पूर्ण केली जाईल."

- डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 22th नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT