World Mother Language Day  esakal
नाशिक

World Mother Language Day Special: गुळापेक्षा गोड आमची अहिराणी! जरा बोलून तर बघा; बहुभाषिक शिक्षण आंतरपिढी शिक्षणाचा आधारस्तंभ

Nashik News : लहानपणापासून ज्या भाषेशी परिचय होतो, ज्या भाषेच्या सानिध्यात बालपण जाते त्या बोलीभाषेला मातृभाषा म्हणतात.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी युनेस्कोने २००० सालापासून दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (World Mother Language Day) साजरा करण्यास सुरवात केली. युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार जगभरात बोलल्या जाणाऱ्या ६ हजार भाषांपैकी जवळपास २६८० भाषा (४३ टक्के) लुप्त होत आहेत.

लुप्त होण्याचे प्रमाण खूप जास्त आणि वेगवान आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी दोन भाषा नाहीशा होत आहेत. त्यामुळे प्रादेशिक सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामानाने अहिराणी भाषेला सुगीचे दिवस आले आहेत. (Nashik World Mother Language Day Special marathi news)

लहानपणापासून ज्या भाषेशी परिचय होतो, ज्या भाषेच्या सानिध्यात बालपण जाते त्या बोलीभाषेला मातृभाषा म्हणतात. नाशिक शहरात राज्यभरातून आलेले विविध संस्कृतीचे लोक राहतात पण शहराच्या लोकसंख्येचा विचार करता कसमादे, खानदेशी भागातील लोक इथे अधिक वास्तव्यास आहेत.

रोजची दैनंदिन भाषा मराठी असली तरी गावाकडे गेल्यावर, गावातला माणूस शहरात भेटल्यावर, गावाकडून फोन आल्यावर अहिराणी भाषाच बोलली जाते. शहरात लग्न असले तरी गाणी खानदेशी लावली जातात. हे असते मातृभाषेवरील प्रेम... महाराष्ट्राची मातृभाषा मराठी असली तरी मराठी बोलण्याचा लहेजा शहारानुसार बदलत जातो.

अहिराणी भाषेचा प्रसार-प्रचार करण्यासाठी अहिराणी साहित्य संमेलन घेतली जातात. शहरात कवी संमेलन, व्याख्यान अहिराणी भाषेत केली जात आहेत. इंटरनेट क्रांतीमुळे इंटरनॅशनल गाण्यांच्या ॲपवर सुद्धा अहिराणी गाणी बघायला, ऐकायला मिळतात हे अहिराणी भाषेचे यश आहे. (Latest Marathi News)

या गाण्यांना यूट्युबवर करोडोंचे व्ह्यूज आहेत. अनेकांनी अहिराणी भाषेत स्वत:चे यू ट्यूब चॅनेल सुरू केली आहेत. या माध्यामातून गावाकडची संस्कृती दाखविली जाते तसेच महिला खानदेशी पदार्थ खास बोलीभाषेतून तयार करून दाखवितात.

२०२३ मध्ये झालेल्या अहिराणी संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून इटली येथील अलीचे डिप्लोरियान या खानदेश साहित्य संस्कृतीच्या अभ्यासक आल्या होत्या. त्याचबरोबर दरवर्षी आमदार सीमा हिरे खानदेश महोत्सव घेतात. शहरात अहिराणी भाषेत कार्यक्रम आयोजित केली जात असल्याने अहिराणी भाषा अनंत काळ टिकून राहील यात शंका नाही.

"आमनी जलमदाती अहिरानी. आम्ही जलमनूत तशी कानवर पडी ऱ्हायनी. तिना भलता लया से आम्हले. आमना खानदेशना मानूस दिसताज आम्ही अहिरानी म्हाज सुटतस इतली ती नसनसम्हा भिनेल से. तिनी गोडी काय वर्नू मी! तुम्ही बोलश्यात ऐकण्यात तवयज तुमले तिना गोडवा समजी! गुईथाईन गोड से हो आमनी अहिरानी! जरा बोली देखा हो.."

- प्रा. सुमती पवार, लेखिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है' राहुल गांधींनी उघडली तिजोरी अन् निघाला अदानी-मोदींचा फोटो, Video Viral

Latest Maharashtra News Updates : नाशिकमधील रेडीसन ब्लू हॉटेलवर निवडणूक आयोगाची कारवाई

ऋषभ पंतसारखाच आणखी एका क्रिकेटपटूचा भीषण अपघात; गाडीचा झालाय चुराडा...

भावासाठी उदयनराजे मैदानात! 'झुकेगा नही साला' म्हणत, कॉलर उडवत शिवेंद्रराजेंना मताधिक्‍याने विजयी करण्याचं केलं आवाहन

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

SCROLL FOR NEXT