veni movie  esakal
नाशिक

Nashik News : जपानच्या ‘शॉर्ट शॉर्ट्स’ महोत्सवात ‘वेणी’चा वर्ल्ड प्रीमियर

Nashik : दिग्दर्शक-लेखक विशाल जेजूरकर यांचा लघुपट ‘वेणी’चे विश्वविख्यात ऑस्कर पुरस्कारासाठी पात्रता म्हणून ओळख असलेल्या टोकियो (जपान) येथील प्रतिष्ठित ‘शॉर्ट शॉर्ट्स’ लघुपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

प्रशांत कोतकर : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : धामणगाव (ता. येवला) येथे स्थित दिग्दर्शक-लेखक विशाल जेजूरकर यांचा लघुपट ‘वेणी’चे विश्वविख्यात ऑस्कर पुरस्कारासाठी पात्रता म्हणून ओळख असलेल्या टोकियो (जपान) येथील प्रतिष्ठित ‘शॉर्ट शॉर्ट्स’ लघुपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. या वर्षी जगभरातून सुमारे पाच हजार प्रवेशिकांच्या माध्यमातून दाखल झालेल्या फक्त २५ चित्रपटांमधून ‘वेणी’ची आशिया आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात निवड झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते विशाल जेजूरकर यांना लघुपट महोत्सवाने टोकियो येथे लघुपटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित केले आहे. ( World Premiere of Veni movie at Japan Short Shorts Festival)

वेणी ही फिल्म धामणगाव ग्रामीण पार्श्वभूमीतून येणारे चित्रपट दिग्दर्शक विशाल जेजूरकर आणि राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या अभिनेत्री अंजली पाटील यांच्यातील सहयोग आहे. अंजली पाटील यांनी ‘वर्षा’ची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. तसेच त्यांच्या अनाहत फिल्म्स या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत या चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे.

ई.एफ.एल. (इको फ्रेंडली लाइफ), ठाणेचे संस्थापक अशोक जगझाप आणि पुण्यातील लेखिका अदिती केळकर हेदेखील या चित्रपटाला सहनिर्माते म्हणून लाभले आहेत. वेणीच्या कथेची कल्पना विशाल जेजूरकर यांना लॉकडाउनमध्ये सुचली होती आणि सहलेखिका स्नेहल कल्पना यांच्या सहकार्याने २०२२ मध्ये ही पटकथा लिहिली गेली.

हा लघुपट साकार करण्यासाठी दिग्दर्शकाला दोन वर्षे वाट पाहावी लागली. वेणीचे चित्रीकरण एप्रिल २०२३ मध्ये मुंबईत अवघ्या तीन दिवसांच्या वेळापत्रकात झाले होते. चित्रपटनिर्मिती सप्टेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाली. ‘वेणी’ फिल्मची कथा तिशीतली गृहिणी ‘वर्षा’च्या अस्ताव्यस्त दैनंदिन दिनचर्येचा मागोवा घेते. (Latest Marathi News)

हा चित्रपट शहरी वातावरणात निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाला भेडसावणारी आव्हाने, अल्झायमरने ग्रस्त असलेल्या प्रिय व्यक्तीची काळजी घेण्याचा भावनिक प्रवास, व्यक्तिमत्त्वावर असलेला आठवणींचा सखोल प्रभाव, वेदनादायक भूतकाळचे प्रदीर्घ टिकणारे परिणाम, पुरुष संततीला प्राधान्य देण्यासाठी भारतात असलेला सामाजिक दबाव, गर्भधारणा आणि मातृत्व यांसारख्या अनेक विषयवस्तू सहजपणे हाताळतो.

वैद्यकीय शिक्षण घेत जपली आवड; पुरस्कारांचा वर्षाव

चित्रपटाचे दिग्दर्शक, सहनिर्माते, संपादक आणि सह-लेखक विशाल जेजूरकर हे धामणगाव या छोट्याशा गावात वाढले आहेत. पुणे येथे वैद्यकीय (बीए. एम.एस.) पदवी शिक्षण घेतानादेखील त्यांची खरी आवड कला, साहित्य, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि चित्रपटांमध्येच होती. परिणामी, त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच स्वतः चित्रपटनिर्मितीचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला.

वैद्यकीय शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षात त्यांनी वैद्यकीय वर्गमित्र आणि त्यांच्या गावातील काही स्थानिक मुलांच्या मदतीने ‘स्क्रॅच’ हा पहिला लघुपट बनविला होता. अमेरिकेतील बोस्टन फिल्म फेस्टिव्हल आणि फ्लिकर्स रोव्हिंग आयलँड फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘स्क्रॅच’ची निवडदेखील झाली होती.

‘स्क्रॅच’ ने आठ वेगवेगळ्या महोत्सवात चार पुरस्कार पटकावले होते. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात ‘द लास्ट लेटर’ या त्यांच्या दुसऱ्या लघुपटासाठी पटकथा लिहिली. या लघुपटाने पटकथा-लेखन स्पर्धेत भारतातील सर्वोच्च पारितोषिक मिळविले व सुमारे ३० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

SCROLL FOR NEXT