World Snake Day Special esakal
नाशिक

World Snake Day Special : सर्प शत्रू नव्हे, मित्र

सकाळ वृत्तसेवा

World Snake Day Special : '‘मारू नये सर्प संतांचिया दृष्टी, होतील ते कष्टी व्यापकपणे’ या तुकाराम महाराजांच्या गाथेमधील अभंग क्र. २९०४ मधील अभंगाच्या काही ओळी आहेत. यातून त्यांनी १७ व्या शतकातच आपल्याला सापांचे महत्त्व सांगून ठेवले आहे. पण इतकी वर्षे उलटूनही समाजात सापांविषयी आजही अनेक गैरसमज, अंधश्रद्धा आणि अज्ञान आहे. त्यातूनच अनेक सापांचा व मनुष्याचा जीव जात असतो. अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा म्हणून साप आपली भूमिका बजावत असतात. मात्र आपल्याकडे त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज असल्याने सापाचे निसर्ग सृष्टीतील महत्त्व मानवाला अजूनही नीटसे समजलेले नाही. साप हा शत्रू नव्हे तर आपला मित्र आहे, हे प्रत्येकाला समजावे, यासाठी १६ जुलै हा दिवस ‘जागतिक साप दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.''- सुदर्शन सारडा, ओझर

( World Snake Day Special Snakes are friends not enemies)

पावसाळ्याला सुरवात झाली, की लोकवस्तीत व शेती परिसरात अनेक साप दिसायला सुरवात होत असते. तसेच सर्पदंशाच्या घटनाही समोर येऊ लागतात. मानवी वस्तीतील त्याच्या मुक्त वावराला आणखी वेग येतो. शेतकऱ्यांचा मित्र असलेला हा प्राणी पर्यावरणाच्या संतुलनात मात्र महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे साप दिसल्यावर त्याला मारण्याचा प्रयत्न न करता सर्परक्षकांना फोन करा आणि सापांच्या संवर्धन व संरक्षणासाठी मदत करा, असे आवाहन एआरइएएस फाउंडेशनकडून वारंवार केले जाते.

सापांचे विविध प्रकार, त्यांच्या विविध जाती जर समजून घेतल्या तर मानव व साप यातील संघर्ष मिटण्यास मदत होईल. जगभरात सापांच्या तीन हजारांहून अधिक, तर भारतात २८० पेक्षा जास्त आणि महाराष्ट्रात ५० पेक्षा जास्त जाती आढळतात. सापांचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते. बिनविषारी, अर्धविषारी/सौम्यविषारी आणि विषारी.

आपल्याकडे आढळणाऱ्या सापांमधील बिनविषारी जाती : उदा. वाळा, मांडूळ, डुरक्याघोणस, नानेटी, धामण, धूळनागीण, गवत्या, तस्कर, अजगर, चित्रक, कवड्या, दिवड (विरोळा), खापरखवल्या आदी. (latest marathi news)

सौम्य विषारी/अर्धविषारी जाती

हरणटोळ, मांजऱ्या, भारतीय अंडी खाऊ साप, रेतीसर्प आदी.

विषारी साप

१) नाग (इंडियन कोब्रा) : हा विषारी साप आहे. उंदीर, बेडूक, सरडे हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. आपल्याकडे जास्त संख्येने नाग दिसतात.

२) घोणस : चार प्रमुख विषारी सापांपैकी एक असलेला, जगातील दोन नंबरचा विषारी साप. चिडल्यास गोल वेटोळे करून बसतो व कुकरच्या शिटीप्रमाणे आवाज काढतो, अंगावर रुद्राक्षाच्या मण्यांप्रमाणे गोल चट्टे असतात.

३) मण्यार : साधा मण्यार, वॉल सिंध मण्यार आणि पट्टेरी मण्यार या तीन प्रकारांत हा साप आढळतो. हा साप कोब्रापेक्षा पंधरापट जहाल विषारी आहे.

४) फुरसे : जहाल विषारी वर्गात याची गणना होते. छोटा असला तरी हा आक्रमक आहे. चिडल्यास स्वतःच्या शरीराचा इंग्रजी ‘एस’ अक्षराप्रमाणे आकार करून स्वतःच्या अंगावर अंग घासून करवत चालल्याप्रमाणे खवल्याचा आवाज करतो.

घराजवळ साप निघाल्यास काय करावे.

सर्वप्रथम सापावर लांबून लक्ष ठेवावे, जवळच्या सर्पमित्र किंवा वन्यजीव अभ्यासकाला फोन करून कळवणे किंवा १९२६ या वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर कळवावे. साप निघालेल्या ठिकाणी गर्दी करू नये, शांतपणे सापावर लक्ष ठेवून सर्पमित्र येईपर्यंत वाट बघणे, साप पकडण्याचे धाडस करू नये. यामुळे जिवावर बेतू शकते.

सर्पदंश झाल्यावर काय करावे

सर्पदंश झाल्यानंतर आरडाओरडा न करता रुग्णाने शांत राहणे, ज्या भागावर सर्पदंश झाला, त्याच्या तीन इंच खाली व तीन इंच वर आणि तसेच हाताला दंश झालेला असेल, तर दंडाच्या भागावर आवळपट्टी बांधावी. पायाला इजा झाली असेल, तर गुडघ्याच्या वरच्या भागाला (मांडीला) आवळपट्टी बांधावी. मोठा रुमाल, ओढणी, दोरी याचा वापर करावा. परंतु बांधताना करकचून बांधू नये, कुठेही कापण्याचा प्रयत्न करू नये, रुग्णाने शारीरिक हालचाली कमी कराव्यात. शक्य तितक्या लवकर जवळील रुग्णालयात जाऊन औषधोपचार करून घ्यावा.

''पावसाळ्यात साप निघण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनेतही वाढ होत असते. मात्र सापाच्या प्रमुख चार विषारी जातीबद्दल माहिती घेतली, तर इतर साप बिनविषारी असून, त्यापासून मनुष्याला काहीच धोका नाही. नागरिकांनी साप दिसल्यास जवळील सर्परक्षकांना बोलवावे. काही सर्परक्षक पेट्रोल खर्चाच्या नावाने नागरिकांकडून अधिकच्या पैशांची मागणी करतात, असे कोणी केल्यास नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधावा.''- अक्षय म्हेत्रे, सहाय्यक वनसंरक्षक (मनमाड)

''१४ वर्षांपूर्वी झालेल्या जीवघेण्या सर्पदंशातून वाचल्यानंतर नागरिकांना सापाबद्दलचे गैरसमज व सर्पदंशाचे उपाय सांगणे गरजेचे आहे, असे लक्षात आल्याने एआरइएएस फाउंडेशनच्या माध्यमातून शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आपल्या शाळा, महाविद्यालय किंवा लोकवस्ती व विविध कार्यालयांत जनजागृती कार्यक्रम घेण्यासाठी तसेच साप आढळून आल्यास तसेच सर्पदंश झाला असल्यास ९७६४८३९८२५, ९८२२८२०९९५, ९८८१०७९१३९, ७४९९५९७१३४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.''- सुशांत रणशूर, सर्पअभ्यासक, एआरइएएस फाउंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT