Temple of Shri Khandoba Maharaj of Marhal Khurd esakal
नाशिक

Khandoba Yatrotsav: 'येळकोट येळकोट'ने प्रती जेजुरी दुमदुमणार! मऱ्हळ येथील खंडोबा महाराजांचा सोमवारपासून यात्रा उत्सव

Nashik News : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ खुर्द येथील श्री खंडोबा महाराज यात्रा सोमवार (दि. 26) पासून सुरुवात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

वावी : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ खुर्द येथील श्री खंडोबा महाराज यात्रा (Marhal khurd Khandoba Yatrotsav) सोमवार (दि. 26) पासून सुरुवात होणार आहे. रविवारी (दि. 25) मध्यरात्री पांगरी येथील मानाचा रथ मऱ्हळ येथे गेल्यानंतर पालखी मिरवणुकीने देव गावालगतच्या यात्रा स्थळावर असलेल्या महाल बागेत चार दिवसांसाठी मुक्कामी जातील.

मऱ्हळचा खंडोबा देवघरात असलेल्या भाविकांना जेजुरीला जाणे वर्ज्य असते. त्यामुळे हे सर्व भावी सहकुटुंब त्यांच्यासाठी प्रति जेजुरी असलेल्या मऱ्हळ येथील यात्रा उत्सवात सहभागी होत असतात. (Nashik Marhal khurd Khandoba Yatrotsav marathi news)

रविवारी (दि. 25) मध्यरात्री पांगरी येथील मानाचा रथ मऱ्हळ येथे गेल्यानंतर पालखी मिरवणुकीने देव गावालगतच्या यात्रा स्थळावर असलेल्या महाल बागेत चार दिवसांसाठी मुक्कामी जातील.

रविवारी (दि. 25) मध्यरात्री पांगरी येथील मानाचा रथ मऱ्हळ येथे गेल्यानंतर पालखी मिरवणुकीने देव गावालगतच्या यात्रा स्थळावर असलेल्या महाल बागेत चार दिवसांसाठी मुक्कामी जातील.सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ येथील खंडोबा यात्रा मोठी मानली जाते. यंदाचा यात्रोत्सव सोमवार दि. 26 पासून सुरु होणार आहे. रविवारी दि. 25 पांगरी येथील मानाचा रथ रात्री उशिरा मऱ्हळ गावात मिरवणुकीने आल्यानंतर यात्रोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.

मऱ्हळ व परिसरातील हजारो कुटुंबे उदरनिर्वासाठी मुंबई परिसरात स्थायिक झाले आहेत या मुंबईकर भाविकांच्या सढळ योगदानातून गावात श्री खंडोबा महाराजांचे भव्य व सुरेख मंदिर साकारले आहे. या मंदिरात वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

मऱ्हळ परिसरातील खंडोबा भक्तांना जेजुरीला जाण्याची परवानगी नाही त्यामुळे घरातील धार्मिक व मंगल कार्य या खंडोबाच्या आशीर्वादाने पार पाडली जातात. चार दिवसांच्या यात्रा काळात सर्वजण आवर्जून उपस्थित असतात. रविवारी रात्री पांगरी येथील रथासोबत गावातील खंडोबा मंदिरातील पालखीची पारंपारिक मिरवणूक काढण्यात येणार आहे.

जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने या मिरवणुकीत फटाक्यांची नेत्र दीपक आतशबाजी करण्यात येते. देव महाल बागेत पोहोचल्यानंतर पुढचे चार दिवस तेथेच मुक्कामी असतात. या ठिकाणी असलेल्या प्रशस्त मैदानात यात्रा भरवली जाते. नांदूर शिंगोटे, वावी, पांगरी, सुरेगाव, मानोरी, निहृळे, भोकणी , कणकोरी , खंबाळे, दोडी या गावातील भाविक यात्रेसाठी उपस्थित असतात.

28 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या यात्रा उत्सवात मास्टर रघुवीर खेडकर , मंगला बनसोडे या ख्यातनाम तमाशा मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी होणाऱ्या कुस्त्यांच्या दंगलीत राज्याच्या विविध भागातून मल्ल सहभागी होणार आहेत. (Latest Marathi News)

सरपंच शिवाजी घुगे, पोलीस पाटील संदीप कुटे, सोसायटी चेअरमन वसंतराव कुटे, तंटामुक्ती अध्यक्ष जयराम कुटे, भाऊसाहेब बोडके, चंद्रकांत कुटे, यात्रा कमिटी अध्यक्ष किरण कुटे, उपाध्यक्ष दिनेश लांडगे, शुभम कुटे, बाळासाहेब शेळके, लक्ष्मण ताडगे हे यात्रोत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

मऱ्हळ येथील यात्रा उत्सव परिसरातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. विशेष करून मुंबईकर भाविकांची यावेळी मोठी गर्दी असते. भाविकांनी यात्रेत येताना आपल्याकडील मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असतील.

तरीदेखील अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येईल अशी माहिती वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांनी दिली.

"मऱ्हळ येथील खंडोबा यात्रेत पांगरी येथील रथाला परंपरागत मान देण्यात आला आहे. देव पांगरी येथे मुक्कामी थांबल्याची आख्यायिका सांगितली जाते. पांगरी येथील रथ पोहोचल्याशिवाय खंडोबाची यात्रा सुरू होत नाही. शनिवारी पांगरी गावातून रथाची संवाद्य मिरवणूक काढण्यात येईल त्यानंतर परत गावाबाहेरच्या दर्पात मुक्कामी असेल. तेथून रविवारी रात्री नऊ वाजता मिरवणुकीने रथ मऱ्हळच्या दिशेने प्रस्थान करेल. पांगरी गावाची शिव ओलांडल्यावर मऱ्हळ येथील ग्रामस्थ अर्थाचे स्वागत करतील. खंडोबा मंदिरात रथ पोचल्यावर पालखी मिरवणूक सुरू होईल."- ज्ञानेश्वर सगर (पांगरी येथील खंडोबा मंदिराचे पुजारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT