Nashik News : सिन्नर, शिर्डी महामार्गावर प्रवास करणाऱ्या साई भक्तांच्या सुविधांसाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्फत सुमारे १४ कोटी रुपये खर्चून सिन्नर तालुक्यातील खोपडी व पाथरे येथे दोन सुसज्ज साई यात्री निवास बांधण्यात आले आहेत. बांधकाम पूर्ण होऊन देखील या वास्तूंचा वापर सुरू करण्यात आला नसल्यामुळे साई भक्तांमध्ये नाराजी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या यात्री निवास वापराबद्दल नियोजन होत नसल्यामुळे साई भक्तांना प्रतीक्षा कायम आहे. (Nashik Yatrinivas of National Highways Department is in bad condition marathi News )
सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सोबतच पदयात्रांसाठी स्वतंत्र मार्गिका हे काम पूर्णत्वास गेले आहे. सिन्नर शिर्डी दरम्यान महामार्गावर नाशिक, गुजरात, मुंबई भागातून येणाऱ्या साई भक्तांची नेहमीच वर्दळ असते. वर्षभर पदयात्री देखील पालख्या घेऊन शिर्डीला येत असतात. या सर्वांच्या सेवेसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून खोपडी व पाथरे येथे स्वतंत्रपणे दोन साईभक्त निवासांचे बांधकाम करण्यात आले आहे.
प्रत्येक ठिकाणी दोन एकर जागेत सुमारे आठ हजार चौरस मीटर इतक्या जागेत या वास्तू साकारण्यात आल्या आहेत. एका ठिकाणच्या बांधकामाचा खर्च जवळपास सात कोटी रुपये इतका आहे. बांधकामात ३२ खोल्यांची बहुमजली मुख्य इमारत. प्रत्येक खोलीत स्वतंत्र शौचालय आणि स्वच्छतागृह, स्नानगृहाची सुविधा आहे.
याव्यतिरिक्त आवारात पुरुषांसाठी चार शौचालय, चार स्नानगृह व नऊ युनिटची स्वच्छतागृह अतिरिक्त आहेत. महिलांसाठी आठ शौचालय व चार स्नानगृह आहेत. २० बाय २५ मीटरचे बहुउद्देशीय सभागृह आहे. तेवढेच मोठे भोजनगृह देखील आहे. बहुउद्देशीय सभागृहात पालखी विसावा व पदयात्रींच्या विश्रांतीची सोय आहे.(latest marathi news)
बहुमजली इमारतीत सुरक्षा व व्यवस्थापन कक्ष, वैद्यकीय मदत कक्ष आहे. मुबलक पाणीसाठा करण्याची व्यवस्था आहे. पालखीसोबत असलेल्या वाहनांची ‘पार्किंग’ ची व्यवस्था आहे. बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्ष होत आली तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या इमारतींचे व्यवस्थापन कोणाकडे द्यायचे याचा निर्णय झालेला नाही.
''शिर्डी संस्थांकडून सिन्नर ते शिर्डी दरम्यान पदयात्रांसाठी पाणीपुरवठा, फिरते आरोग्य पथक, सावलीसाठी मंडप या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याच सुविधा राष्ट्रीय महामार्ग विभागाने बांधलेल्या यात्री निवासात उपलब्ध करून दिल्या तर त्या अधिक फायदेशीर ठरतील. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू.''- गोरक्षनाथ गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिर्डी साईबाबा संस्थान.
''राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने शिर्डी मार्गावरील खोपडी व पाथरे प्रमाणे इतरही वेगवेगळ्या ठिकाणी यात्री निवास बांधण्यात आले आहेत. टेंडर पद्धतीने दिल्ली मुख्यालयातून हे यात्री निवास मक्तेदारांना दिले जातील. साईबाबा संस्थान सारखी संस्था यात्री निवास व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यायला पुढाकार घेणार असेल तर योग्यच आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय दिल्लीत घेतला जाईल.''- दिलीप पाटील, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.