YCMOU nashik esakal
नाशिक

Nashik YCMOU Result: महिन्‍याभरात जाहीर झाले मुक्तच्या परीक्षांचे निकाल; अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाच्‍या वापरामुळे झाले शक्‍य

YCMOU Result : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील उन्हाळी परीक्षांचे २४ मे ते १२ जून या कालावधीत आयोजन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik YCMOU Result : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील उन्हाळी परीक्षांचे २४ मे ते १२ जून या कालावधीत आयोजन केले होते. राज्‍यभरात पार पडलेल्‍या या परीक्षांचे निकाल नुकतेच विद्यापीठाने जाहीर केले आहेत. अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना उत्तरपत्रिका तपासत विद्यापीठाने मर्यादित वेळेत निकाल जाहीर केले. मुक्त विद्यापीठातील शिक्षण घेणारे बहुतांशी विद्यार्थी नोकरी, व्यवसाय करत असल्याने त्यांना परीक्षेसाठी सोयीचे व्हावे, यासाठी २० दिवसाच्या अल्प कालावधीत केले होते. (Mukt exam results declared within month )

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धतीचा अवलंब करून सर्व परीक्षांचे निकाल ३० दिवसांत जाहीर केले आहेत. सर्व परीक्षांचे निकाल गेल्‍या ८ जुलैला जाहीर केले. विद्यापीठाने अत्याधुनिक स्कॅनिंग पद्धतीचा अवलंब करून उत्तरपुस्तिकांचे कालमर्यादेत स्कॅनिंग करून महाराष्ट्रभर निश्चित केलेल्या १०८ ऑनलाइन मूल्यमापन (कॅप) केंद्रावरील नियुक्त परीक्षकांची बायोमेट्रिक ऑथेन्टीकेशनसह फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांच्या ओळखीची सत्यता पडताळून उत्तरपुस्तिकांचे मूल्यमापनाचे कामकाज ऑनस्‍क्रीन डिजिटल इव्‍हॅल्‍युएशन पद्धतीद्वारे पूर्ण करताना निकाल जाहीर केला.

या उत्तरपुस्‍तिका मूल्यमापनाचे कामकाज त्वरित पूर्ण होण्यासाठी विद्यापीठातील सर्व विद्या शाखा संचालक, आठ विभागीय केंद्रावरील विभागीय संचालक व तेथील कर्मचारी, तसेच परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. निकाल डिजिटल युनिव्हर्सिटी पोर्टलवरील अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील रिझल्‍ट या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. (latest marathi news)

२५ लाख उत्तरपत्रिकांची तपासणी

उन्हाळी परीक्षेसाठी ११० शिक्षणक्रमांसाठी २४२ सत्रनिहाय परीक्षांसाठी एकूण चार लाख ८९ हजार ६६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. राज्‍यातील ६०१ परीक्षा केंद्रांना ऑनलाइन व गोपनीय पद्धतीने एक हजार ३०७ प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्‍या होत्‍या. परीक्षेस उपस्‍थित विद्यार्थ्यांच्‍या एकूण २५ लाख १२ हजार २८४ उत्तरपत्रिका तपासून वेळेत निकाल जाहीर करण्याची जबाबदारी विद्यापीठाने पार पाडली.

पुनर्मूल्‍यांकनासाठी २२ पर्यंत मुदत

जाहीर झालेल्या निकालाच्या उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची सुविधा परीक्षा विभागाने उपलब्ध केली आहे. विद्यार्थ्यांने प्रथमतः विहित शुल्क ऑनलाइन भरून उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त करावी. त्यानंतर २२ जुलैपर्यंत उत्तरपत्रिकांच्‍या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे, असे विद्यापीठाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT