येवला : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ (बॅच-१) संशोधन व विकास अंतर्गत येवला मतदारसंघातील ८ रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या ४१ किलोमीटरच्या आठ रस्त्यांसाठी ५३ कोटी ९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. (Nashik Yeola 8 roads will be upgraded with fund of 53 crores)
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून हा निधी मिळणार असून यामुळे दुर्लक्षित रस्त्यांना झळाळी मिळणार आहे. तालुक्यातील बाभूळगाव बु. ते भालेराव वस्ती या ४.२० किलोमीटर रस्त्याची दर्जोन्नतीसाठी ५ कोटी ८४ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच ममदापूर ते लांबेवस्ती रस्ता ४.८०० किमी रस्त्यासाठी ६ कोटी २० लाख ७९ हजार, नगरसूल ते खिर्डीसाठे ७.२०० किमी रस्त्यासाठी १० कोटी ३४ लाख ४३ हजार,
राममा-०२ ते धामणगाव या ३.३९० किमी रस्त्यासाठी ४ कोटी ८७ लाख ७० हजार, राममा-०८ ते अनकुटे ते कुसूर रेल्वे स्टेशन या ५.२०० किमी रस्त्यासाठी ६ कोटी ७१ लाख ५५ हजार रुपये निधी मंजूर केला आहे. तसेच रामा-०१ ते मानोरी बु. या ५.२४० किमी रस्त्यासाठी ६ कोटी ९७ लाख ६२ हजार, येवला ते बाभूळगाव-भाटगाव-अंतरवेली-पिंपरी-साबरवाडी-खैरगवहाण-धनकवाडी- बाळापूर-विसापूर-नगरचौकी रोड ४.१०० किमी रस्त्यासाठी ४ कोटी ६४ लाख. (latest marathi news)
तर निफाड तालुक्यातील खडक माळेगाव ते प्रजिमा-१७४-टाकळी विंचूर या ६.५७० किमी रस्त्यासाठी ७ कोटी ९४ लाख ८४ हजार रुपये निधीतून रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दर्जोन्नती करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या पुढील दहा वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी ५३ लाख ८५ हजार रुपये निधीची तरतूद केल्याने रस्त्यांचा दर्जाही टिकून राहून नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कामाला लवकरच सुरवात होऊन कामे पूर्ण करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.