The handsome Agar at Yeola & damaged bus esakal
नाशिक

Yeola MSRTC Depot: जुन्या बसमुळे लागली दृष्ट! 5 बस स्क्रॅपच्या वाटेवर, सर्व बसचे आयुर्मान झाले 10 वर्षांचे; नव्या बसची प्रतीक्षा

Latest Nashik News : मागील सात वर्षांत एकही बस मिळालेली नाही. पाच बस स्क्रॅप करण्याच्या वाटेवर असून, इतर बसचे आयुर्मान सरासरी दहा वर्षांचे असल्याने नवीन बस केव्हा मिळणार, हा प्रश्न येवलेकरांना पडला आहे.

संतोष विंचू

Yeola MSRTC Depot : नाशिक ते छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर ते मालेगाव महामार्गावर मध्यवर्ती असलेल्या येथील बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलल्याने फलाटासह काँक्रिटीकरणाचा परिसर देखणा झाला आहे. असे असले तरी आजूबाजूलाच असलेल्या गटारी, खड्ड्यात गेलेले आगार अन शौचालयाची दुरवस्था आणि जुन्याच बसमुळे प्रवाशांना मनस्ताप सोसतच प्रवास करावा लागतो.

विशेष म्हणजे मागील सात वर्षांत एकही बस मिळालेली नाही. पाच बस स्क्रॅप करण्याच्या वाटेवर असून, इतर बसचे आयुर्मान सरासरी दहा वर्षांचे असल्याने नवीन बस केव्हा मिळणार, हा प्रश्न येवलेकरांना पडला आहे. (Yeola MSRTC Depot 5 buses on scrap waiting for new one)

इंदूर ते पुणे आणि मुंबई ते यवतमाळपर्यंत धावणाऱ्या बस या स्थानकातून जातात. दररोज ५५० बस या स्थानकातून जात असल्याने प्रवाशांची वर्दळही मोठी आहे. पैठणीची बाजारपेठ असल्याने प्रवाशांची संख्या मोठी असताना आगाराच्या बसची दुरवस्था मोठी समस्या बनली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील अनेक आगारांना नव्या बस मिळाल्या, मात्र येवल्याला एकही बस मिळालेली नाही.

सुंदरता, उत्पन्नात बाजी!

नाशिक ते छत्रपती संभाजीनगर, तसेच अहमदनगर ते मालेगाव महामार्गावरील हे मध्यवर्ती बसस्थानक आहे. कांद्यासह पैठणीची बाजारपेठ असल्याने येथून प्रवाशांची संख्याही मोठी असते. दोन वर्षांपूर्वी आमदार दराडे बंधूंच्या प्रयत्नातून परिसराचे काँक्रिटीकरण होऊन दोन फलाटही नव्याने झाल्याने बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलला आहे.

त्यातच राज्य परिवहन महामंडळाच्या स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात पहिल्या दोन सर्वेक्षणांमध्ये आगार ‘अ’ बसस्थानक प्रवर्गात नाशिक जिल्ह्यात प्रथम आले होते. गेल्या सात वर्षांनंतर आगाराने गत महिन्यात सुमारे १४ लाखांचा नफा मिळवत उत्पन्नात प्रथम क्रमांक पटकावला आहे, ही जमेची बाजू आहे.

वर्षानुवर्षे आगार वंचितच..!

बसस्थानक सुंदर झाले असले, तरी शौचालयाची वर्षानुवर्षाची समस्या तशीच आहे. मागे साचलेली घाण व गटार तसेच बसस्थानकाच्या पुढील मोकळ्या जागेत साचलेल्या तळ्यामुळे दुर्गंधी पसरते. शहराच्या बाजूने बसस्थानकाचे काँक्रिटीकरण राहिल्याने हा भाग ओसाड पडला आहे.

आतील आगाराची तर सर्वाधिक दुरवस्था झाली असून, आत संपूर्ण परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्याने पावसाळ्यात खड्डे, तर इतर दिवसांत फुफाट्यात बस उभ्या असतात. संपूर्ण आगाराची प्रशासकीय कार्यशाळा इमारत जुनी होऊन मरणकळा अवस्थेत आहे. चालक-वाहकांच्या विश्रांती खोलीची दुरवस्था झाली असून, आतील शौचालयाच्या दुर्गंधीचा वास नेहमीची समस्या बनल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. काँक्रिटीकरणासह आगाराची नव्याने इमारत बांधण्याची गरज आहे.

बसची वाजली बेल!

आगारातून लांब पल्ल्याच्या रोज दहा, तर ग्रामीण भागातील सुमारे २१२ फेऱ्या होतात. वास्तविक, आगाराला ५० बसची गरज असताना सध्या केवळ ४० बस उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी येथील पाच बस स्क्रॅपला देण्यात आल्या. पुढील महिन्यात तीन, तर डिसेंबरमध्ये दोन अशा पाच बस स्क्रॅपच्या वाटेवर आहेत. बसचे आयुर्मान पंधरा वर्षांचे असते, मात्र येथील प्रत्येक बसचे सरासरी आयुर्मान आता दहा वर्षे झाले आहे. त्यामुळे नवीन बस केव्हा मिळणार, हा सवाल येवलावासीयांना पडला असून, किमान दहा नव्या बसची गरज आहे.

कर्मचारी संख्या अपुरी

आगाराची उत्पन्नात नेहमीच बाजी असते. त्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. चालक-वाहकांची तब्बल १५-१५ अशी ३० जणांची कमतरता असल्याने अनेकांना डबल ड्यूटी करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक बससह कर्मचारी नियुक्तीची प्रतीक्षा आहे. (latest marathi news)

पोलिस नेमणार केव्हा?

पूर्वी बसस्थानकावर पूर्णवेळ एक पोलिस नेमलेला असायचा. आता प्रवाशांची संख्या दुपटीने वाढूनही एकही पोलिस या ठिकाणी नेमलेला नसतो. अनेकदा चोरीच्या घटनाही बसस्थानकावर घडतात. किंबहुना, महिलांची-मुलींची छेड काढण्याचे प्रकार होत असूनही येथे पोलिस नेमलेला नसतो, ही खेदाची बाब आहे.

आकडे बोलतात...

- आगार दर्जा- अ

- एकूण बस- ४०

- रोजच्या बसफेऱ्या- २१२

- आगारात ये-जा करणाऱ्या बस- ५५०

- चालक-वाहक- १६४

- यांत्रिक कर्मचारी- २६

- प्रशासकीय कर्मचारी- २१

- एकूण कर्मचारी- २१२

"बसची परिस्थिती अत्यंत खराब असून, प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होते. बस वेळेवर मिळत नाही. मुलींची छेड काढण्याचे प्रकारही मागे घडले आहेत. सर्वपक्षीय बैठकीत मुलींना बसण्यासाठी स्वतंत्र शेवटच्या फलाटावर व्यवस्था करण्यात येईल, असे सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात तसे झाले नसून, पोलिस नेमणूक होत नाही. सीसीटीव्हीही नेहमी नादुरुस्त असतात. प्रवासी हितासाठी या समस्या सुटाव्यात."- योगेश सोनवणे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ, येवला

"बसस्थानकाला झळाली मिळाली असली, तरी राहिलेल्या भागाच्या काँक्रिटीकरणाची मागणी केली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या योगदानामुळे स्वच्छता अभियानासह उत्पन्नात आम्ही बाजी मारली. पाच बस स्क्रॅप होणार असून, इतर बसही जुन्या आहेत. बसची नव्याने मागणी केली असून, इलेक्ट्रिक बसही आगाराला मिळणार आहेत. त्यानंतर बसची समस्या मार्गी लागेल."- प्रवीण हिरे, आगारप्रमुख, येवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawr : रोहित तू थोडक्यात वाचलास, अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक

Share Market Today: शेअर बाजारातील ट्रेंडमध्ये झाला बदल; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT