yeola Shiva devotees taking advantage of Mahaprasad in Amardham at Mahamrityunjaya temple in Amardham here. esakal
नाशिक

Nashik News : अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरात प्रत्येक प्रदोषला भरते यात्रा!

सकाळ वृत्तसेवा

येवला : जेथे इहलोकाला निरोप दिला जातो, त्या अमरधामविषयी नागरिकांमध्ये असलेली भीती आणि दहशत वेगळीच. मात्र, येथील अमरधाम त्याला अपवाद ठरले आहे. कारण, येथील अमरधाममध्ये देशातील पहिल्या भगवान शिवशंकराच्या महामृत्युंजय मंदिराने अमरधामची भीतीच कायमची दूर केली आहे. दररोज पहाटे व रात्री दर्शनासाठी रांगा लावून भाविक येतातच. (Yeola Yatra is held for every Pradosh in Maha Mrityunjaya Temple in Amardham)

पण प्रत्येक प्रदोषला याठिकाणी पाच ते सात हजार भाविक येऊन दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतात. महाप्रसादाची एक वर्षाची ‘बुकिंग’ आजच फुल्ल असल्याने या मंदिराची ख्याती सहजपणे लक्षात येते. शहरातील बसस्थानकाजवळील अमरधाममध्ये भल्या पहाटेच भाविक मंदिराची स्वच्छता आणि फुलांनी सजावट करायला सुरवात करतात.

सायंकाळी तर विजेच्या लखलखटात, दीपमाळांनी उजळून टाकलेला हा परिसर म्हणजे अमरधाम का, हा प्रश्नच पडतो. यंदाच्या २७ जानेवारीला येथील भगवान शिवशंकराच्या महामृत्युंजय मंदिराला ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार, अमावस्या व पौर्णिमा या दिवशी पहाटे पाचला भोलेबाबाच्या मूर्तीला व महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यात येतो.

तर इतर दिवशी सकाळी सहाला पूजा करण्यात येते. एकादशीनंतर येणाऱ्या प्रदोषच्या दिवशी दुपारी चारला अभिषेक असतो. या वेळी शिवभक्तांना रुद्राक्ष व चांदीचे बेलपत्राचे वाटप केले जाते. विशेष म्हणजे प्रदोषच्या दिवशी अभिषेक झाल्यावर सायंकाळी पाच ते सात हजार भाविक अमरधाममध्ये बसून महाप्रसाद खातात. (latest marathi news)

दररोज सकाळी पूजा झाल्यावर भोलेबाबाच्या मूर्तीला व महादेवाला सकाळी नाश्त्याचा नैवेद्य आणि दुपारी व रात्री जेवणाचा नैवेद्य दाखविला जातो. मंदिरात रोज रुद्राक्षाची माळ जप करून घेतली जाते व शिवलीलामृताचा अकरावा अध्याय वाचून घेतला जातो.

शिवभक्तांची राज्यभरातून असते गर्दी!

आलेल्या भाविकांची इच्छा व मनोकामना पूर्ण होत असल्याने या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. काही भाविकांना तर चमत्कारिक अनुभवही आले आहेत. शहरासह तालुक्यातील भाविक, तसेच पुणे, मुंबई, धुळे, घोटी, इगतपुरी, नाशिक, वैजापूर, कोपरगाव, मनमाड तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून मध्य प्रदेश, छिंदवाडा येथील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरात वर्षातील दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, अक्षयतृतीया, महाशिवरात्र यासह सर्व हिंदू सण-उत्सव साजरे केले जातात. श्रावणात या ठिकाणी १६ सोमवारची पूजा करण्यासाठी महिला व पुरुषही असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT