Tree Plantation esakal
नाशिक

Nashik YIN News: नाशिकचे भौगोलिक सौंदर्य ऊर्जायुक्त : डवले

सकाळ वृत्तसेवा

Nashik YIN News : नाशिकचे भौगोलिक सौदर्य प्रचंड ऊर्जा देणारे आहे. येथील परिसर पाहून मन प्रफुल्लित होते. गोदाकाठी धार्मिक वातावरणामुळे तर एक वेगळीच अनुभूती मिळते, असे प्रतिपादन यिनच्या मुख्यमंत्री आचल डवले यांनी केले. (Nashik YIN Dawle statement Geographical beauty of Nashik is energetic)

‘सकाळ’ माध्यम समूह आयोजित यिन कॅबिनेट मंत्रिमंडळ दौरा राज्यभर सुरू आहे. दौऱ्यात यिनच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आचल डवले यांच्यासह यिनचे कॅबिनेट मंत्री देखील दौऱ्यामध्ये सहभागी आहेत.

मंत्रिमंडळ सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. या मंत्रिमंडळाने आज त्र्यंबकेश्वर, पिंपळगाव बसवंत येथे भेटी दिल्या. त्यानंतर डवले बोलत होत्या. त्यांनी पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात ‘आमची शंभर झाडे’ उपक्रमात सहभाग नोंदविला.

उपमुख्यमंत्री काजल चव्हाण, यिन स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बाजीराव शिंदे, यिन गटनेता विश्वभूषण पाटील, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, पिंपळगाव महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र मोरे, उपप्राचार्य प्रा. दिलीप माळोदे, क्रीडासंचालक प्रा. हेमंत पाटील, प्रा. भगवान कडलग, प्रा. अमोल मेहेंदळे, प्रा. नामदेव गावित, प्रा. नरेंद्र बोरस्ते, अनिल ठुबे, दीपक बनकर, महेश लभडे, शिवप्रसाद गवळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डवले पुढे म्हणाल्या, की नाशिक जिल्हाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने प्रफुल्लित झालेली ही भूमी शहर द्राक्ष व कांदा उत्पादनात देशात अव्वल आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक ओळख असलेल्या या शहराला भेट दिल्याने खूप छान वाटले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे राजेवाडी येथे भातलागवड करणाऱ्या शेतकरी महिलांसोबत भात लावण्याचा अनुभव घेतला.

"यिन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कॅबिनेट दौरा नाशिक जिल्ह्यातील मविप्र पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही चळवळ अतिशय प्रेरक आणि उपयुक्त वाटत आहे. यिन मुख्यमंत्री आणि त्यांचे शिष्टमंडळ ‘आमची शंभर झाडे’ उपक्रमात सहभागी झाल्याने महाविद्यालयातील तरुणाईला, तसेच आमच्या सर्व टीमला ऊर्जा प्राप्त झाली आहे. येत्या काळात यिनच्या सर्व उपक्रमांना महाविद्यालयात सहकार्य असेल."

- डॉ. ज्ञानोबा ढगे, प्राचार्य, कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत.

"मविप्र पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाच्या क्रीडांगण परिसरात कडूलिंब, वड, पिंपळ आणि दीर्घकाळ टिकणारे फळझाडे यांची लागवड केली. महाविद्यालयाचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. महाविद्यालयात असलेली रोपवाटिका ही प्रत्येक महाविद्यालयात असावी. प्रत्येक विद्यार्थ्यांना रोपांची उपलब्धता व शेतकऱ्यांना फळझाडे दिल्याने परिसरात वृक्षांची संख्या वाढत असून, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी खूप प्रामाणिकपणे हे काम करत असल्याचे पाहून आनंद होत आहे." - काजल चव्हाण, यिन उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

KL Rahul ची कसोटीमधून निवृत्ती? 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, खराब फॉर्ममुळे निर्णय घेतल्याचा दावा

SCROLL FOR NEXT