Nashik News : शारीरिक सदृढता आणि मानसिक एकाग्रता ठेवण्यासाठी योग आणि प्राणायाम करणे नितांत गरजेचे आहे. पोलिस खात्यामध्ये शारीरिक मेहनत आणि सकारात्मक मानसिकतेची गरज असते. मात्र ते नेहमी ऊर्जावर्धक ठेवायचे असेल तर प्रत्येकाने नियमित योगसाधना आणि प्राणायाम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस अकादमीचे राजेश कुमार यांनी केले. (Yoga demonstration at Police Academy on occasion of International Yoga Day)
त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील कवायत मैदानावर महाराष्ट्र पोलीस अकादमी, सुयश हॉस्पिटल, श्री संग गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘दैनिक सकाळ’च्या सौजन्याने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने योग व प्राणायम प्रात्यक्षिक शिबिर घेण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक राजेश कुमार.
उपसंचालक काकासाहेब डोळे, उपसंचालक अनिता पाटील, सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील ओस्तवाल, रुचिता ठाकूर, श्री संग गुरुजी चॅरिटेबल ट्रस्टचे संगू गुरुजी, सुरूमा यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री संग गुरुजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने योगशिक्षक संगू गुरुजी, सुरुमा यांनी योग व प्राणायाम वर्गासाठी पोलीस अधिकारी. (latest marathi news)
कर्मचार्यासह प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक, उपनिरीक्षक असे सुमारे ९०० जणांनी सहभाग घेतला होता. योगासनातील विविध आसनांसह मानसिक एकाग्रतेसाठी प्राणायाम करून घेतले. तसेच, यावेळी योगासनांमुळे होणारे फायदे तर, प्राणायामामुळे एकाग्रतेसह मानसिक थकवा दूर होण्याचे फायदे त्यांनी सांगितले. यावेळी अकादमीचे संचालक राजेशकुमार यांच्या हस्ते संगू गुरुजी यांचा तर उपसंचालक अनिता पाटील यांच्या हस्ते सुरुमा यांचा सन्मान करण्यात आला.
भरगच्च मैदान
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या कवायत मैदानावर बुधवारी (ता. १९) पहाटे सहा वाजता योग प्रात्यक्षिकाला प्रारंभ झाला. यावेळी मैदानावर अकादमीतील पोलीस अधिकार्यांसह अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक.
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक असे सुमारे ९०० जणांची उपस्थिती होती. त्यामुळे अकादमतीचे कवायत मैदान भरगच्च भरून गेलेले होते. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात योग साधना करताना उत्साहवर्धन ऊर्जा निर्माण झाली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.