Yogita Suryavanshi esakal
नाशिक

Inspirational Story : शेतीकाम करून योगिताने मिळविले यश! निरपूरच्या लेकीकडून आई-वडिलांची स्वप्नपूर्ती

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वडील नववी, तर आई पाचवी उत्तीर्ण. पण, परिस्थितीअभावी त्यांचे शिक्षण थांबले. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची. आपले शिक्षण झाले नाही म्हणून काय झाले, मुलांनी तरी शिकावे हे स्वप्न घेऊन मुलांच्या शिक्षणाची तळमळ ठेवणाऱ्या नवे निरपूर (ता. बागलाण) येथील शेतकरी भावसिंग सूर्यवंशी यांची स्वप्नपूर्ती त्यांच्या लेकीने म्हणजे योगिताने पूर्ण केली.

वेळोवेळी शेतीकामात अन् घरकामात मदत करून अभ्यास करीत तिने बारावीच्या इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात ८३.३३ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. येथील ‘मविप्र’ संचलित कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा निकाल यंदा १०० टक्के लागला.

प्रतिकूलतेवर मात करीत कुटुंबाचे अपेक्षांचे ओझे पेलवत शेतीसाठी मदतीचा हात देतानाच घरची जबाबदारीही निभावत योगिता भावसिंग सूर्यवंशी हिने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी विभागात ८३.३३ टक्के मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला.

योगिता शेतकरी कुटुंबातील असून, नवे निरपूर येथील पश्चिमेस दीड किलोमीटर अंतरावरील डोंगर पायथ्याशी असलेल्या आपल्या मळ्यातून मिळेल त्या वाहनाने अथवा पायी प्रवास करून ती दररोज महाविद्यालयात यायची. महाविद्यालयातून घरी आल्यावर आई-वडिलांना शेतीकाम व घरकामात मदत करीत तिने हे यश मिळविले. (latest marathi news)

सूर्यवंशी कुटुंबीयांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताचीच असल्याने योगिता वडिलांना शेतीकामात मदत करते. कांदा लागवड, निंदणी ही कामे करण्याबरोबरच भारनियमन काळातील पिकांना पाणी देण्याचे कामही ती आवडीने करते. मोठी बहीण द्वितीय वर्ष विज्ञान शाखेचे, तर लहान भाऊ आठवीत शिक्षण घेत आहे.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व वडिलांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच हे यश मिळाल्याचे ती आवर्जून सांगते. बालपणापासून हुशार असलेल्या योगिताचे पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंजवाडच्या जनता विद्यालयात पूर्ण झाले. दहावीच्या परीक्षेतही तिने ८९ टक्के गुण मिळविले होते.

‘आयटी’त करिअरचा मनोदय

भविष्यात बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स करून संगणकातील काही भाषांचे शिक्षण घ्यायचे आणि पुढे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात करिअर करण्याचा योगिताचा मनोदय आहे. आजोबा, आई, वडील व मोठी बहीण यांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार मेधणे, अभ्यासक्रम प्रमुख प्रा. सुनील बागूल, प्रा. निरंजन जाधव, प्रा. निखिल पवार, प्रा. रेखा सावंत आदींसह प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे मला हे यश मिळविता आल्याचे तिने स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT