नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ तारखेला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्तांसह कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्तालयाचे ‘ॲण्टी टेरर सेल’मार्फत शहरातील हॉटेल्स, लॉजेस्, घरभाडेकरूंची कसून तपासणी केली जात आहे.
दरम्यान, गुरुवारी (ता.४) विभागीय आयुक्तांसह पोलीस आयुक्तांनी नियोजित हेलीपॅड व कार्यक्रमस्थळाची पाहणी करून बंदोबस्ताचा आढावा घेतला. (Nashik Youth Festival Thorough Checking by Anti Terror Cell Vigilance in view of PM Modi visit news)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १२ तारखेला राष्ट्रीय युवा महोत्सव दिनानिमित्ताने आयोजिक कार्यक्रमासाठी नाशिक दौर्यावर येत आहेत.
ओझर येथून हेलिकॉप्टरने ते हिरावाडीतील स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथील हेलिपॅडवर येणार आहेत. तेथून ते मोटारीने तपोवनातील साधूग्राम येथे नियोजित कार्यक्रमस्थळी जाणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या या दौर्यादरम्यान दहशतवादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या ॲण्टी टेरर सेल सतर्क झाला आहे. या पथकाकडून शहरातील हॉटेल्स, लॉजिंग्स्ची कसून तपासणी केली जात आहे.
याठिकाणी येणाऱ्यांची दररोज नोंद घेतली जात आहे. त्याचप्रमाणे, शहरातील घरभाडेकरूंचीही चौकशी करून तपासणी केली जात आहे. तसेच सीमकार्ड खरेदी-विक्रीचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
सदरची तपासणी सातत्याने केली जाणार असून, केंद्रिय यंत्रणेकडून येत्या काही दिवसात विशेष पथके शहरात दाखल होणार आहेत. या पथकांकडूनही बंदोबस्तासह सुरक्षिततेचा आढावा घेऊन त्यांच्याकडूनही चोख नियोजन केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुन्हा पाहणी
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या दौर्याच्या पार्श्र्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिकेचे आयुक्त अशोक करंजकर यांनी क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.४) पुन्हा स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल परिसराची पाहणी केली.
याठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरसाठी हेलीपॅड उभारण्यात येणार आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपोवनातील साधुग्राम येथे होणाऱ्या कार्यक्रमस्थळाचीही पाहणी करीत कामकाजाचा आढावा घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.