Youngsters enjoying swimming here. Young people gathered for swimming. esakal
नाशिक

Nashik News : चला पोहायला आठवणींच्या हिंदोळ्यात! चांदोरीत पोहण्याचा आगळा-वेगळा सोहळा

Nashik : गोदावरीत सध्या तरुण पोहण्याचा आनंद लुटत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी याठिकाणी गर्दी पहायला मिळत आहे.

सागर आहेर

Nashik News : येथील गोदावरीत सध्या तरुण पोहण्याचा आनंद लुटत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी याठिकाणी गर्दी पहायला मिळत आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक तरुणांनी डुबकी मारली. चांदोरी गाव तसे गोदाकाठी वसलेले. बाराही महिने नदीला पाणी, पूर्वी उन्हाळा म्हटलं की चांदोरीची मुलं सकाळ- संध्याकाळ नदीवर दिसायची. उन्हापासून वाचण्यासाठी दिवसातून किमान ३ वेळा नदीवर पोहणे व्हायचे. ( youth is currently enjoying swim in Godavari due to summer )

नंतर नदीवर भत्ताभेळची पार्टी रंगायची, घरचे लोक पोरगा कुठे गेला या भीतीने नदीवर धावत यायचे आणि बऱ्याच वेळा मुलांना फटके बसायचे. मुले नदीवर अंघोळ करून आले की नाही, हे त्या काळात मुलांच्या ओल्या करदोड्याहुन ओळखला जायचे. पण, काळ बदलला आणि हे सगळं थांबलं. नदीवर उन्हाळ्यात कुणी अंघोळीला येईनासे झाले. हे बघून चांदोरीचे भूषण मटकरी जे सध्या रेडिओ मिरचीमध्ये आरजे आहेत.

एक संकल्पना आली की एकदिवस पोहण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे. त्या निमित्ताने नवीन पिढी पोहायला शिकेल आणि गावातून बाहेर गेलेली जुनी मंडळी पोहण्याच्या निमित्ताने गावात येतील. या संकल्पनेनुसार गेली ८ वर्षांपासून चांदोरी गावामध्ये एप्रिल-मे महिन्यात पोहण्याचा एक कार्यक्रम ठेवण्यात येतो. (latest marathi news)

यासाठी नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्या मुंबई, पुणे, नगर आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या सगळ्या चांदोरीकरांना आमंत्रण धाडण्यात आले आणि मे महिन्यातील रविवारी (ता. १९) हा कार्यक्रम सकाळी ८ ते ११ या वेळेत पार पडला.

यावर्षी भूषण मटकरी, चेतन वनारसे, योगेश सोनावणे, ज्ञानेश्‍वर टर्ले, दीपक वायकंड, विलास घाडगे, प्रमोद मटकरी, विलास सूर्यवंशी, सागर गडाख, अर्शद इनामदार, ज्ञानेश्‍वर गडाख, विराज वनारसे, ओम शिंदे, सोमनाथ कोटमे, नितीन रोकडे, बबलू रोकडे, रंगनाथ रौंदळ, विषांक वनारसे, वृषभ पाटील, अमोल खर्डे, सार्थक मटकरी, सागर आहेर आदी उपस्थित होते.

पोहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यानी चहा घेत तर्रीदार मिसळीवर ताव मारला. या उपक्रमामुळे चांदोरीमधील पोहण्याची परंपरा सुरु असण्याबरोबरच नवीन पिढीतील मुलांनाही पोहोण्यास शिकविले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT