Police personnel taking away the petrol bottle from the hands of the protestors. esakal
नाशिक

Nashik News : बागलाणच्या तरुणांचा अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न!

Latest Nashik News : कोठावदे व त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबई नाका पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले. मुंबई नाका पोलिस ठाणे येथे घेऊन गेले. त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सटाणा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ वरील अतिक्रमण त्वरित काढून घ्यावी व त्यानंतरच काँक्रिटीकरण सुरू करावे. या मागणीसाठी साई सावली फाउंडेशनच्या प्रशांत कोठावदे प्रफुल्ल कुवर, चेतन सूर्यवंशी, विजय सोनवणे, भूषण निकम, योगेश सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक येथील कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. कोठावदे व त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबई नाका पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले. मुंबई नाका पोलिस ठाणे येथे घेऊन गेले. त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. (Youth of Baglan attempted self immolation in PWD)

सटाणा शहरांमध्ये काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे रस्ता अतिशय अरुंद झालेला आहे. अतिक्रमण न काढताच काँक्रिटीकरण करण्याच्या निर्णयामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला रोषाला सामोरे जावे लागत आहे.

अतिक्रमणांमुळे रस्ता एक सारखा दिसत नाही. रस्ता २४ मीटर रुंदीचा करण्याबाबत एकमत झाले होते. मात्र तरीही त्यानंतर काम सुरू झाले. त्यामुळे आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा निर्णय आहे. (latest marathi news)

"रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण आहे त्यामुळे रस्ता अरुंद झालेला आहे वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अपघात होऊन जीवित हानी त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे.शासनाच्या नियमाप्रमाणे अतिक्रमण काढले जावे."- प्रशांत कोठावदे, आंदोलक

"सटाणा शहर हद्दीतील काम सध्या स्थगित ठेवण्यात आलेले आहे.अतिक्रमण काढण्याच्या प्रक्रियेसाठी काही कालावधी लागतो. यामध्ये एकापेक्षा अधिक विभागांचा समावेश असतो.संबंधित अहवाल आम्ही वरिष्ठांना पाठविला आहे."

- ए. जी. शेलार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT