Lok Sabha Election 2024 esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Election : सर्वाधिक मतदान करणाऱ्या गावांचा सन्मान; मी ठरवेल माझा खासदार

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा परिषदही सरसावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा परिषदही सरसावली आहे. गत निवडणुकीत कमी मतदान झालेल्या जिल्ह्यातील १०० मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ‘मी ठरवेल, माझा खासदार’ असे घोषवाक्य करीत विविध उपक्रम राबविण्यात येतील. ज्या ग्रामपंचायतींतर्गत सर्वाधिक मतदान होणार आहे, अशा दोन ग्रामपंचायतींचा जिल्हास्तरावर, तर तीन ग्रामपंचायतींचा पंचायत समितीस्तरावर सन्मान केला जाईल. (nashik Zilla Parishad is also gearing up to increase voting percentage in Lok Sabha elections marathi news)

जिल्हा नियोजन भवनात मंगळवारी (ता. १९) निवडणुकीच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, नगरपंचायत, नगर परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक झाली. बैठकीत मतदान टक्केवारी वाढविण्याबाबत चर्चा होऊन मार्गदर्शन करण्यात आले.

यंदाच्या लोकसभेत मतदानाचा टक्का वाढविण्‍यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेत, गत निवडणुकीत कमी मतदान झालेली केंद्रे आणि महिलांचे कमी मतदान झालेली केंद्रे, गावे, वस्त्या यावर लक्ष केंद्रीत करीत जनजागरणावर भर दिला जाणार आहे. शाळा, गावांत बैठका घेऊन जनजागृती केली जाईल.

पालकसभा घेऊन, पाल्यांकडून पत्र लिखाण करून घेतले जाणार आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागांतर्गत वारकरी मंडळांना भजनी साहित्यांचे वाटप करण्यात आले, त्या मंडळांकडून भजन, कीर्तनातून मतदान जागृती करण्याचे आदेश देण्यात आले. (latest marathi news)

महिला बचत गटांची मदत

महिलांची टक्केवारी वाढविण्यासाठी महिला बचत गटांच्या गावोगावी सभा घेतल्या जाणार आहेत. यात शिक्षिका, आशा व आरोग्यसेविका या ‘डोअर टू डोअर’ जाऊन महिलांशी संवाद साधतील. ग्रामपंचायतींत स्पर्धा घेतल्या जातील. ज्या ग्रामपंचायतीत सर्वाधिक मतदान होईल, त्यांना जिल्हा व पंचायत स्तरावर पुरस्कार देऊन गौरविले जाईल. विविध समुदाय नेते, पुढारी यांच्या एकत्रित बैठका आयोजित केल्या जाणार आहेत.

समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग व तृतीयपंथी यांच्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. जिल्ह्यात स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण मोठे असल्याने त्यांचे मतदान करून घेण्यासाठी काम केले जाणार आहे. या मतदारांची यादी करून त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्यावर यंत्रणा काम करतील. सर्व यंत्रणांनी मिळून टक्केवारी वाढविण्यासाठी आयोजित उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्रीमती मित्तल यांनी या वेळी केले.

नवमतदारांवर भर द्यावा

जिल्ह्यातील नवमतदारांनी मतदान करावे, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांच्या बैठका आयोजित करायच्या. या बैठकांमध्ये नवमतदारांपर्यंत पोहोचून मतदानाबाबत जनजागृती करावी, अशा सूचना श्रीमती मित्तल यांनी दिल्या. महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका या शिक्षकांनी घेऊन त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT