Nashik ZP News esakal
नाशिक

Nashik ZP News : निर्मलवारी नियोजनासाठी जिल्हा परिषद सरसावली; डॉ. अर्जुन गुंडे यांनी यंत्रणेला लावले कामाला

Nashik News : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी निर्मलवारीच्या माध्यमातून २.२४ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी निर्मलवारीच्या माध्यमातून २.२४ कोटींचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. निधी मंजुरीनंतर, जिल्हा परिषद यंत्रणा वारीच्या नियोजनासाठी सरसावली आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी संबंधित यंत्रणा, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज संस्थान विश्वस्त, निर्मलवारी संस्था प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीस सर्व संबंधित यंत्रणांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. (Zilla Parishad prepare for Sant Nivruttinath Maharaj Nirmalwari planning)

यात प्रामुख्याने वॉटरप्रूफ मंडपाचे नियोजन हे वारी मुक्कामी असलेल्या ग्रामपंचायतींकडे देण्यात आले आहे. त्यासाठी एक लाखाचा निधी देण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. १८) जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्राप्त निधीमधून खर्च अन् नियोजन करण्यात आले. या सर्व कामांच्या निविदा न काढता थेट पुणे येथील आळंदी वारीमधील निश्चित ठेकेदारांना काम देण्यात आले आहे. त्याचे प्रारंभ आदेश या वेळी देण्यात आले.

जिल्ह्यातील ज्या गावांमधून पालखी प्रस्थान होणार आहे. त्या सहा ग्रामपंचायतींना प्रत्येकी तीन लाखांचे सहाय्य अनुदान तसेच सातपूर व पंचवटी या दोन ठिकाणच्या मुक्कामासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. बैठकीस संत निवृत्तीनाथ ट्रस्टच्या अध्यक्ष कांचन जगताप, नारायण मुठाळ, राहुल साळुंखे, नीलेश गाढवे, सोमनाथ घोटेकर आदींसह सहा गावांतील सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार, सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(latest marathi news)

वारीसाठी असतील या सुविधा

गेल्या वर्षी वारीत गजलेल्या टॅंकरमधून गढूळ पाणी मिळाल्याच्या तक्रारी या वेळी झाल्या. मात्र, यंदा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सहा टॅंकर दिले जाणार आहेत. यात पिण्याचे पाणी व वापरायचे पाणी हे स्वतंत्र असणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २० हजार लिटरचे सहा टँकर वारीच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत असणार आहेत.

वारकऱ्यांच्या स्नानाची सोय करणे व वारी निघाल्यानंतर स्वछतेचे नियोजन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे. पालखीसोबत जनरेटर व्हॅन पूर्ण वेळ असणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दोन रुग्णवाहिका तसेच खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मंडळाकडून एक, ‘मविप्र’ संस्थेची एक अशा चार रुग्णवाहिका वारीसमवेत राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT