नाशिक

Nashik: जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वीज पुरवठा खंडित ई लर्निग साहित्य नादुरुस्त होण्याची भीती

Nashik Zp School News: परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम दिसला.

सकाळ वृत्तसेवा

Latest ZP News: जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा थकीत वीज बिलांमुळे खंडित केल्यामुळे शाळांमधील डिजिटल व ई लर्निंग साहित्य बंद अवस्थेत धूळखात पडून नादुरुस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीकडून नवीन मीटर सेवाशुल्क भरण्याची सक्ती केली जात असल्याने शाळांना दुहेरी आर्थिक फटका बसण्याची भीती आहे.

खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार शिक्षण क्षेत्रात संगणकाचा वापर करून दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामपंचायत व लोकसहभागातून सर्व शाळा डिजिटल करून ई लर्निंग साहित्य पुरविण्यात आले.

तत्पूर्वी सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा विद्युतीकरण करण्यात आले. ई लर्निगमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम दिसला.

मात्र कोरोना काळात शाळा बंद असताना व विजेचा वापर होत नसून देखील वीज बिलांची आकारणी करण्यात आल्याने वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित करून शाळांचे वीज मीटर काढण्यात आले. आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुन्हा नवीन मीटर सेवाशुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. अशा परिस्थितीत शाळांकडे पुरेसे अनुदान उपलब्ध नसल्याने वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून ई लर्निंग अध्यापन बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासावर विपरीत परिणाम होत आहे. वीजबिले माफ करून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पालक शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.

शासनाकडून देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या अनुदानातून शालेय खर्च करावा लागतो. ई लर्निंग साहित्य बंद असल्याने त्यांची देखभाल दुरुस्ती करावी लागेल. त्यामुळे वीज बिलांसाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.

- अशोक अहिरे (शिक्षक नेते प्राथमिक शिक्षक संघ)

शाळांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात यावा व ग्रामपंचायतीकडून शाळांची वीजबिले भरण्याची तरतूद करून तसेच जुन्या ग्राहक असलेल्या शाळांना नवीन मीटर सेवाशुल्क भरण्याची सक्ती करू नये.

- भास्कर बिरारी (अध्यक्ष स्कूल कमिटी कंधाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT