Narhari Zirwal esakal
नाशिक

Narhari Zirwal News : झिरवाळ विचारणार सरकारला जाब! धनगर आरक्षणावरून सरकारविरोधात करणार आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा शब्द दिला आहे. यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी नेते आक्रमक होत थेट आमदारकीचे राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. यातच आता विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ चांगलेच आक्रमक झाले असून, राज्य सरकार विरोधात मैदानात उतरत बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. (Zirwal against government over dhangar reservation)

विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. झिरवाळ प्रसार माध्यमांशी बोलत होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजातील नेते, लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत गत आठवडयात श्री. झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने धनगर आणि धनगड हे वेगळे आहे, असे सांगूनही राज्य सरकार आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून धनगर आरक्षणाचा जीआर काढत आहे.

सरकारने जीआर काढला तर सर्व आदिवासी आमदार राजीनामा देतील, असा इशारा यावेळी आमदारांनी दिला होता. याच मुद्यावर श्री. झिरवाळ पुन्हा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकार विरोधात सोमवारपासून मंत्रालयात समोर असलेल्या गांधी पुतळ्याजवळ बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे श्री. झिरवाळ यांनी सांगितले. (latest marathi news)

सरकारने धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्याचा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आदिवासी समाजाच्या सर्व आमदारांसह विविध आदिवासी संघटनांचा देखील विरोध असल्याने ते देखील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे राज्यात आता ओबीसी-मराठा नंतर धनगर-आदिवासी वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...मात्र यावेळी ते चालणार नाही; १२ जागांची मागणी, भाजपला पत्रही लिहिले, रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

Pune Glass Factory Accident : काचेच्या कारखान्यात माल उतरवताना दोघांचा मृत्यू! येवलेवाडीतील घटना; आणखी दोघे गंभीर

Pakistan Cricket मध्ये पुन्हा मोठा बदल! माजी दिग्गजाने दिला सिलेक्टर पदाचा राजीनामा, कारणही सांगितलं

Latest Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेंचा मृतदेह उल्हानगरकडे रवाना

रुग्णाची लाइफ सपोर्ट सिस्टीम नेमकी कधी हटणार, सरकार घेऊन येतंय नवीन मार्गदर्शक तत्वे; 'या' गोष्टींचा असणार समावेश

SCROLL FOR NEXT