झोडगे : सध्या रणरणत्या उन्हात जिवाची काहिली होणारे ऊन पडत आहे. यातच झोडगे उपबाजार समितीमध्ये उन्हाने त्रस्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची व बसण्यासाठी सावलीची सुविधा नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (Zodge sub market problems with drinking water and non availability of sheds)
झोडगे उपबाजारात अनेक वर्षापासून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मार्केट परिसरात शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. झोडगे येथील बाजार समितीच्या कांदा खरेदी केंद्रावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच विश्रांतीसाठी सावलीची सुविधा नाही.
सध्या मालेगावचे तापमान दररोज ४२ अंश डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक आहे. एवढ्या कडक उन्हात शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांना पिण्याचे एक बाटली पाण्यासाठी आपले वाहन सोडून भटकंती करावी लागते. तर सावलीसाठी आपल्या वाहनांच्या आडोशाला थांबून प्रचंड उन्हाच्या झळा अंगावर घ्यावा लागत आहेत.
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा खरेदी केंद्र येथे आहे. कांदा खरेदीसाठी बावीस ते तेवीस व्यापाऱ्यांचा अधिकृत नोंदणी परवाना आहे. प्रत्यक्षात मात्र दैनंदिन खरेदीसाठी आठ ते नऊ व्यापारी बोलीच सहभागी होतात. (latest marathi news)
त्यापैकी दोन तीन प्रमुख व्यापारी सोडल्यास बाकी व्यापारी नाममात्र हजेरी लावत असल्याचे चित्र येथे दिसून येते. नाशिक व धुळे जिल्ह्यातील शेतकरी येथे कांदा विक्रीसाठी आणतात. मात्र कांदा खरेदी करणारे व्यापारी कमी असल्याने इतर ठिकाणच्या भावांपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
बाजार समितीने पिण्याचे पाणी, सावली आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. परवाना दिलेल्या व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होण्यास सक्ती करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
"झोडगे येथील उपबाजारात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा सेवा सुविधा मिळत नाहीत. पिण्याचे पाणी व सावलीची सुविधा नसल्याने पाणी व सावलीच्या शोधात भटकंती करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा." - भाऊसाहेब महाजन, शेतकरी, बोरकुंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.