Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News: अनुदानित साहित्य खरेदीसाठी अर्ज करा : कृषी विभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषद सेस योजना सन २०२३-२४ करिता ५० टक्के किंवा मर्यादित अनुदानावर ट्रॅक्टर, रोटकेटर, कडबाकुट्टी यंत्र व वीजपंप संच या कृषी साहित्यासाठी डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना पुरवठा करण्यासाठीची योजना जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. (Nashik ZP Apply for purchase of subsidized materials Agriculture Department appeal)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी शेतकऱ्याने सातबारा उतारा व खाते उतारा, विहीत नमुन्यातील अर्ज पंचायत समितीकडे सादर करावेत. तसेच, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थी असल्यास जात प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभ देण्यात येईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनुदानावर साहित्य खरेदीसाठी तालुकास्तरावर पंचायत समिती येथे कृषी अधिकारी/विस्तार अधिकारी (कृषी) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN 1st Test : Shakib Al Hasanचं 'काळा' धागा चघळण्यामागचं मॅजिक; दिनेश कार्तिकनं उलगडलं लॉजिक

Priyanka Gandhi: जेपी नड्डांच्या पत्राला प्रियंका गांधींचं उत्तर; म्हणाल्या, चुकीच्या भाषेचा वापर...

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT