Nashik ZP CEO Ashima Mittal esakal
नाशिक

Nashik ZP News : सॅम, मॅम बालकांचे प्रोफाईल तयार करा : आशिमा मित्तल

Nashik ZP : जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. यात, आदिवासी भागात स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. यात, आदिवासी भागात स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील कुपोषणाकडे पुन्हा लक्ष केंद्रीत केले. कुपोषित बालकांची संख्या कमी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील अतितीव्र कुपोषित (सॅम) व तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीतील बालकांचे प्रोफाईल तयार करण्यात यावे. (Nashik ZP Ashima Mittal statement of Child Profile marathi news)

त्यावर वेळोवेळी लक्ष केंद्रित करून सॅम व मॅम बालकांमधील कुपोषण दूर करावे, अशा सूचना श्रीमती मित्तल यांनी केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या (कै.) रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीत श्रीमती मित्तल यांनी सर्व प्रकल्पांतील कुपोषित बालकांचा आढावा घेतला.

यात कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी सॅम व मॅम बालकांची यादी तयार करून त्यांची पार्श्वभूमी, इतिहास यांची सविस्तर माहिती गोळा करण्यात यावी, यादी तयार करून त्यांचे मॉनेटरिंग करावे, त्यांची नियमित उंची, वजन घ्यावे. या बालकांना कोणता आहार देण्याची गरज आहे, याचा अभ्यास करून तो आहार देण्यावर भर द्यावा.  (latest marathi news)

त्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येऊन उपचार वेळेत होतील, यासाठी काम करावे, असे श्रीमती मित्तल यांनी सांगितले. या बैठकीत २१ मार्चपूर्वी महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी बांधकामासाठी सर्व निधी खर्च करण्यात यावा, असे निर्देश श्रीमती मित्तल यांनी दिले. सर्वसामान्य क्षेत्रातील १३ व पेसा क्षेत्रातील १३ अशा २६ प्रकल्पांचा आढावा झाला. शासन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील ५०१ मिनी अंगणवाडी सेविकांपैकी ४९६ मिनी अंगणवाडी सेविकांना नियमित अंगणवाडी सेविकापदी श्रेणीवर्धन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ३५० रिक्त पदांपैकी ३३५ मदतनीस रिक्त पदांची जाहिरात आचारसंहिता लागण्यापूर्वी देण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह प्रशासन अधिकारी संजय सोनवणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नितीन पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT