ZP CEO Ashima Mittal, Nashik News esakal
नाशिक

ZP CEO Ashima Mittal : आवास योजनेतील लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागवून घ्या : आशिमा मित्तल

Nashik News : ग्रामपंचायत विभागांतर्गत १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्चाचा ग्रामपंचायत, पंचायत व जिल्हा परिषद स्तरावरील सविस्तर आढावा घेत, निधी वेळात खर्च करण्याच्या सूचना मित्तल यांनी दिल्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत प्रधानमंत्री, रमाई, शबरी आवास योजना, मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे प्रस्ताव ४ जुलैपर्यंत मागविण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. (Call for proposals from beneficiaries of Awas Yojana)

सभेत विविध विभागांतील योजना, निधी, खर्च याचा आढावा झाला. ग्रामपंचायत विभागांतर्गत १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्चाचा ग्रामपंचायत, पंचायत व जिल्हा परिषद स्तरावरील सविस्तर आढावा घेत, निधी वेळात खर्च करण्याच्या सूचना मित्तल यांनी दिल्या. ग्रामसेवक असहकार आंदोलनाबाबतची माहिती या वेळी देण्यात आली.

यात ग्रामसेवक संघटनेने केलेल्या १७ मागण्यांपैकी १३ मागण्या पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने बैठकीत दिली. उर्वरित मागण्यांबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. नरेगा, मिशन भगीरथ, मॉडेल स्कूल, शाळा संरक्षण भिंत, सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन बांधकाम, प्लॅस्टिक प्रक्रिया केंद्र आढावा.

१५ व्या वित्त आयोग आराखड्यात बदलणे, महिला बालकल्याण १० टक्के योजना, कुपोषण निर्मुलन, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आदींचा आढावा झाला. अखर्चित निधी जमा करण्याबाबतची माहिती या वेळी सादर करण्यात आली. पेन्शन सॉफ्टवेअरची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली. (latest marathi news)

यात ऑगस्ट महिन्यापासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन ऑनलाइन दिला जाणार आहे. यात चार हजार २७२ कर्मचाऱ्यांपैकी तीन हजार २३४ कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट भरण्यात आली आहे. उर्वरित माहिती भरण्याचे काम सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र पडताळणीबाबत बैठकीत चर्चा झाली.

यात ७८ कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र पडताळणी केली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात पूर्व भागात पाऊस असला तरी पश्चिम पट्ट्यात अद्याप पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे अनेक भागात टॅंकर सुरू आहे. दुष्काळी असलेल्या भागात टॅंकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे निर्देश मित्तल यांनी या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT