Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News : बेकायदेशीर पत्राने ‘ग्रामसेवक’चे असहकार आंदोलन गुंडाळले; ग्रामसेवक युनियन संघटनेत सोमवारी बैठक

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांच्या अंतर्गत वाद उफाळून आल्याने ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेकडून शुक्रवार (ता. ७)पासून सुरू करण्यात येणारे असहकार आंदोलन गुंडाळण्यात आले. सदर आंदोलन बेकायदेशीर असल्याचे पत्र संघटनेला पाठविल्यावर संघटनेने तत्काळ शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेत, असहकार आंदोलन करीत नसल्याचे सांगितले. तसेच, ग्रामसेवक युनियनच्या मागण्यांबाबत आता सोमवारी (ता. १०) बैठक आयोजित केली असल्याचे मित्तल यांनी सांगितले. ( illegal letter wrapped up non cooperation movement of Gram Sevak)

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक कार्यमुक्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांतर्गत वाद उफाळून आल्यावर ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेने जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील प्रलंबित प्रश्नांविरोधात येत्या ७ जूनपासून असहकार आंदोलन करण्याबाबतचे पत्र मित्तल यांना दिले. या पत्राची दखल घेत मित्तल यांनी ६ जूनला दालनात बैठक आयोजित केली होती. बैठकीसाठी ग्रामसेवक युनियनसह तांत्रिक ग्रामसेवक संघटना, आदिवासी ग्रामसेवक संघटना, पदवीधर ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले.

त्याबाबतचे पत्रही देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी (ता. ६) मित्तल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला महाराष्ट्र कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना, आदिवासी ग्रामसेवक संघटना, दिव्यांग ग्रामसेवक संघटना, संवर्ग अ कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थिती लावत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे या संघटनांच्या प्रतिनिधींनी जाहीर करीत, असहकार आंदोलनात सहभागी होणार नसल्याचेही जाहीर केले. (latest marathi news)

मात्र, ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी बैठकीस अनुपस्थित होते. संबंधित युनियनने आमच्या मागण्या वेगळ्या असल्याचे सांगत, स्वतंत्र वेळ देऊन बैठक घ्यावी, अशी मागणी करीत पत्र दिले अन आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. मात्र, यानंतर प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत बैठकीत चर्चा न करता आंदोलनाची भूमिका अनधिकृत असल्याचे पत्राद्वारे कळविल्याचे समजते.

प्रशासनाच्या या पत्रामुळे ग्रामसेवक युनियन बॅकफूटवर आली अन संघनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मित्तल यांची भेट घेतली. यात संघटनेने असहकार आंदोलन करीत नसल्याचे कळविल्याचे मित्तल यांनी सांगितले. ग्रामसेवक युनियनच्या मागण्यांबाबत सोमवारी (ता. ८) बैठक घेऊन चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संघटना पदाधिकारी नॉटरिचेबल

याबाबत ग्रामसेवक युनियनचे सरचिटणीस संजय गिरी तसेच संघटनेचे राज्य अध्यक्ष असलेले कैलास वाघचौरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पदाधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT