Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत ५१ परिचर, वाहनचालक कर्मचारी पदोन्नतीने कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. परिचर संवर्गातून ४९ तर वाहन चालक संवर्गातून २ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली असून कर्मचाऱ्यांना आदेशाचे वाटप देखील करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. (Nashik ZP News)
सामान्य प्रशासन विभागाच्या तत्परतेने गत महिन्यात अनुकंपा कर्मचारी गट ड मधून गट क संवर्गात समुपदेशनाचे समायोजन करण्यात आले. परिचर संवर्गातून ४९ तर वाहन चालक संवर्गातून २ कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागांतर्गत परिचर कर्मचारी पदोन्नती संदर्भात मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समितीची बैठक झाली होती.
यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, सहायक गट विकास अधिकारी प्रशांत पवार, सदस्य सचिव परदेशी यांनी १४० पदोन्नती प्रस्तावांची पडताळणी केली. यापैकी ६६ प्रस्ताव पदोन्नती समितीने पात्र ठरवले. यानंतर गुरुवारी (ता.१५) सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने परिचर संवर्गातून पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली.
यात, परिचर या पदावरून कनिष्ठ सहायक पदावर अशा एकूण ५१ परिचर कर्मचाऱ्यांना समुपदेशनातुन पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. पदस्थापना देण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागलीच पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. पदोन्नती प्रक्रियेत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनाली भार्गवे, गणेश बगड, वरिष्ठ सहायक भास्कर कुवर, कनिष्ठ सहायक कानिफ फडोळ आदींनी परिश्रम घेतले.
यांना मिळाली पदोन्नती
योगेश्वर दशपुते, गणेश साबळे, रणजित परदेशी, योगेश बत्तीसे, गुलाब पाटील, शरद जाधव, रवींद्र सोळंके, हर्षल बोरसे, मंदाबाई चव्हाण, रानी आसान, किरण दवंगे, ज्ञानेश्वर खडके, शिवराम सांगळे, योगेश केदारे, महेश गोळेसर, कैलास आव्हाड, वैजनाथ फटांगळे, तुषार केकाण, राजेंद्र सूर्यवंशी, संदीप दराडे, शिवाजी खेमनार, मंगेश दराडे, कैलास मते, मीनल शिंदे, संगीता ढिकले.
संदीप आडके, संगीता साठे, अर्चना दप्तरे, अनिता सांगळे, वैशाली निफाडे, उज्वला जोशी, सुरेखा साळुंके, कल्याणी पवार, शीतल सूर्यवंशी, सविता म्हस्के, मंगला रणदिवे, अरुणा उगले, जयश्री नंदवाणी, शीतल गांगोडे, भारती लहारे, पुनम सोळुंके, पुंडलिक दळवी, गणेश बेदाडे, संगीता सूर्यवंशी, यमुना नाईक, सचिन गवारे, गीतांजली जाधव, प्रमोद मराठे, जनार्दन जाधव, अरुणा मदने, सुनील गवळी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.