नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी क्रीडा स्पर्धांसाठी वाढीव ठेवण्यात आलेल्या आठ लाख रुपयांच्या प्रस्तावावरून चहूबाजूने टीकास्त्र झाल्यानंतर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेत, रद्द केला आहे. क्रीडा स्पर्धांसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या १० लाख रुपयांच्या निधीतूनच या स्पर्धा करण्यात येणार आहे.
वाढीव निधीची आवश्यकता लागल्यास कर्मचारी वर्गाने स्वतः वर्गणी काढण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आठवडाभरापासून गाजत असलेल्या वाढीव खर्चाच्या विषयावर पडदा पडला आहे. (Nashik ZP News proposal of 8 lakhs for sports competition is cancelled nashik news)
यंदा जिल्हा परिषदेत कर्मचारी क्रीडा स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत खेळाडूंना क्रीडा साहित्य, जेवण, ट्रॉफी, रोषणाई, म्युझिक व मैदान भाडे आदींसाठी खर्च केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात १० लाख रुपयांची तरतूद केलेली आहे.
मात्र, क्रीडा स्पर्धेचा एकूण उत्साह, महिला कर्मचारी तसेच इतर नवीन विविध खेळांचा समावेश केल्याने वाढलेल्या स्पर्धा, कर्मचारी वर्गासाठी स्वतंत्र किट असणार असून, तीन दिवस कर्मचारी वर्ग स्पर्धासाठी असणार असल्याने स्पर्धेसाठी आणखी आठ लाख रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करत, त्यास मान्यतेचा घाट घातला होता.
या बाबत, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही अंधारात ठेवले गेले. मात्र, वाढीव ८ लाखांच्या प्रस्तावांवर टीका होऊ लागली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या अध्यक्ष करंडक स्पर्धेसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली जाते.
दुसरीकडे मात्र, कर्मचारी वर्गासाठी १८ लाख रुपये खर्च केला जात असल्याने हा विषय अगदी लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचला. यातच, नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने आचारसहिंता सुरू आहे. यात हा प्रस्ताव कसा मंजूर झाला असा प्रश्न उपस्थित करत, काही संघटना थेट विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याच्या तयारीत होत्या.
मात्र, तत्पूर्वीच प्रशासनाने वाढीव ८ लाख रुपयांचा प्रस्ताव गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी (ता.१७) प्रशासन आणि कर्मचारी संघटना प्रतिनिधींच्या बैठक झाली. यातही वाढीव खर्चावर चर्चा करत, प्रशासन त्यास तयार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. याचवेळी तरतूद केलेल्या दहा लाख रुपयांतच स्पर्धा चांगल्या प्रकारे करण्याचा निर्णय यावेळी झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.